-
भारतीय आहार : पारंपरिक पोषणशास्त्राचं उदाहरण
भारतीय आहार हा हजारो वर्षांची परंपरा आणि संतुलित पोषण या दोन्हींचं संगम आहे. योग्य प्रमाणात घटक निवडले तर हा आहार केवळ स्वादिष्ट न राहता, आरोग्यदायीही ठरतो. (फोटो सौजन्य : Pexels) -
भाज्यांचा भरपूर समावेश
भारतीय आहारात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. हिरव्या पालेभाज्या, गाजर, कोबी, बीटरूटसारख्या रंगीबेरंगी भाज्या फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स देतात. (फोटो सौजन्य : Pexels) -
संपूर्ण धान्य ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत
भात, ज्वारी, नाचणी, बाजरी, गहू यांसारख्या धान्यांमुळे शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट्स मिळतात. या घटकांमुळे ऊर्जा मिळते आणि पचनक्रियासुद्धा सुधारते. (फोटो सौजन्य : Pexels) -
प्रोटीनयुक्त घटक
भारतीय आहारात डाळी, कडधान्य, पनीर, अंडी, मासे यांचा समावेश करून शरीराच्या स्नायू आणि ऊतींच्या मजबुतीस मदत होते. दररोज पुरेसे प्रोटीन घेणं आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. (फोटो सौजन्य : Pexels) -
आरोग्यदायी फॅट्स
योग्य प्रमाणात गरजेचे तूप, नारळाचं तेल, तीळ, अळशी, सुकामेवा यांमधील फॅट्स हे शरीराला उष्णता आणि मेंदूसाठी पोषण पुरवतात. मात्र, त्याचा अतिरेक टाळावा. (फोटो सौजन्य : Pexels) -
दुग्धजन्य पदार्थांचा समावेश
भारतीय आहारात दही, ताक, दूध यांचा समावेश पारंपरिकपणे केला जातो. यामधून मिळणारं कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि हाडं मजबूत करतात. (फोटो सौजन्य : Pexels) -
पाणी आणि द्रवपदार्थ
पाणी, लस्सी, ताक, आयुष काढा किंवा कोमट पाण्याचा योग्य वापर हा भारतीय आहाराचाच भाग आहे. हायड्रेशनमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. (फोटो सौजन्य : Pexels) -
भारतीय आहारात जर योग्य प्रमाणात पोषकतत्त्वांचा समावेश केला, तर तो दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. यामध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक पोषणशास्त्र यांचा सुंदर समतोल आहे. (फोटो सौजन्य : Pexels)

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”