-
डोळ्यांचे आरोग्य तुमच्या आहारापासून सुरू होते; पांढरा ब्रेड, पास्ता व रिफाइंड कार्ब्समुळे रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे=डोळ्यांच्या पडद्याच्या पेशींना हानी पोहोचू शकते. (स्रोत: फ्रीपिक)
-
अल्कोहोल
अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करण्यामुळे डोळे डिहायड्रेट होतात, व्हिटॅमिन ए च्या शोषणात अडथळा निर्माण होतो आणि रात्रीच्या वेळेसही दृष्टी चांगली राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डोळ्यांच्या नसांचे नुकसान होऊ शकते.(स्रोत: फ्रीपिक) -
जास्त प्रमाणात तेल
ट्रान्स फॅट्स आणि हायड्रोजनेटेड तेलांमुळे मॅक्युलर डीजनरेशनची शक्यता वाढते, ज्यामुळे वयानुसार डोळ्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतृो. (स्रोत: फ्रीपिक) -
नूडल्स
इन्स्टंट नूडल्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये असणारा मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) जास्त प्रमाणात असल्यास डोळ्यांसाठी धोकादायक असलेल्या एक्सायटोटॉक्सिसिटीचा धोका वाढतो. (स्रोत: फ्रीपिक) -
तळलेले अन्न
तळलेले व प्रक्रिया केलेले अन्न डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे रक्ताभिसरण खराब होते आणि डोळ्यांच्या ऊतींचा जलद नाश होऊ शकतो. (स्रोत: फ्रीपिक) -
जास्त प्रमाणात मीठ
मिठाच्या अत्याधिक सेवनामुळे उच्च रक्तदाब होऊन, डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीसारखा गंभीर आजार उद्भवू शकतो. (स्रोत: फ्रीपिक)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग