-
आजकाल बहुतेक लोकांच्या कामाचा वेळ खुर्चीत बसून, संगणकासमोर जातो. अशा स्थितीत शरीराला बऱ्यापैकी ताण आणि थकवा येतो. तज्ज्ञांनी दिलेल्या सात सोप्या आणि प्रभावी टिप्स तुमच्या दैनंदिन कामकाजात आरोग्य टिकवण्यासाठी मदत करतील..
-
नियमित हालचाल करा
जास्त वेळ बसून काम केल्यास रक्ताभिसरण मंदावते, स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे दर ३०-४० मिनिटांनी उठून थोडे चालणे किंवा स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे, यामुळे शरीर ताजेतवाने राहते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा) -
चांगल्या दर्जाच्या ऑफिस वस्तू
उभं राहता येणारे टेबल, डेस्क ट्रेडमिल किंवा अर्गोनॉमिक खुर्ची यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा) -
डेस्कवर साधे व्यायाम करा
काम करताना उभं राहून किंवा खुर्चीवर बसून काही हलके व्यायाम करायला हवेत. हात-पाय स्ट्रेच करा, मान फिरवा, हळूच वेगळ्या हालचाली करा, ज्याने स्नायूंना आराम मिळेल. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा) -
सूक्ष्म क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहा
जसे की काम करताना उभे राहून फोनवर बोलणे, छोटी कामं करताना चालत फिरणे, यामुळे शरीर सतत हालचालीत राहते आणि थकवा कमी होतो. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा) -
योग्य पद्धतीने बसा
खुर्चीची उंची आणि पाठीचा आधार योग्य असायला हवा. स्क्रीन आणि डेस्कच्या अंतरावर लक्ष द्या, जास्त जवळ बसल्याने डोळ्यांना त्रास होतो. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा) -
दिनचर्येत हालचाल वाढवा
कामाच्या बाहेरही शक्य तितकी हालचाल करा. चालायला जा, ताजी हवा घ्या, उभं राहा आणि थोडा व्यायाम करा, यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा) -
दररोज व्यायामाचा समावेश करा
रोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहतं, हृदय निरोगी राहतं आणि शरीराची ताकद वाढते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग