-
पीसीओडी म्हणजे काय?
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओडी) असलेल्या महिलांना अनियमित मासिक पाळी आणि जास्त रक्तस्राव होतो. त्यावर उपचार न केल्यास मधुमेह आणि कर्करोगाचा धोका वाढतो. -
आहारात बदल करून पीसीओडीवर नियंत्रण
कार्बोहायड्रेट्स कमी करून, जसे उच्च कॅलरीजचा नाश्ता आणि कमी कॅलरीयुक्त दुपारचे जेवण यांद्वारे इन्सुलिनचे प्रमाण कमी करता येते आणि पीसीओडीच्या आजारात सुधारणा करता येऊ शकते. -
प्रथिनयुक्त आहार महत्त्वाचा
अंडी, मासे, टोफू, चिकन व डाळी यांसारखी प्रथिने शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. काजू, बदाम, अक्रोडही मध्यम प्रमाणात फायदेशीर ठरतात. -
कडुलिंब तेलाचा नैसर्गिक फायदा
डॉ. नित्या म्हणतात की, कडुलिंबाच्या तेलाचे दोन थेंब चांगल्या तेलात मिसळून पोटाला मालिश केल्याने पीसीओडीच्या त्रासदायक लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते. -
सकाळी गरम पाण्याचा वापर आणि मालिश
केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल पोटावर ठेवल्याने पीसीओडी, अनियमित मासिक पाळी व एंडोमेट्रिओसिसच्या त्रासांमध्ये आराम मिळतो. -
काय टाळावे?
प्रक्रिया केलेले अन्न, साखरयुक्त स्नॅक्स, फास्ट फूड, कार्बोनेटेड पेये, जास्त चरबीयुक्त पदार्थ, केक-कँडी व चहा-कॉफीचे जास्त प्रमाणातील सेवन टाळणे गरजेचे आहे.
डॉक्टरांचा सल्ला
पीसीओडीच्या समस्याग्रस्त व्यक्तींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आहार आणि जीवनशैलीत योग्य ते बदल करावेत. वेळेवर उपचार केल्यास या समस्या दूर करता येतात.

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”