-
दात पांढरे करण्यासाठी लोक अनेक नैसर्गिक उपाय वापरतात, ज्यात स्ट्रॉबेरीदेखील चर्चेत आहे. पण स्ट्रॉबेरी खरोखर दात पांढरे करण्याची क्षमता आहे का, याबाबत शंका आहे. (फोटो: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले मॅलिक अॅसिड नैसर्गिकपणे दातांवरील डाग हळुवारपणे कमी करू शकते; पण त्याचा परिणाम तात्पुरता असतो, असे दंततज्ज्ञ डॉ. निकिता मोटवानी सांगतात. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
स्ट्रॉबेरी दातांच्या आतील रंगावर परिणाम करू शकत नाही. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने दात पांढरे करू शकत नाही; फक्त दात स्वच्छ दिसतात. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
स्ट्रॉबेरीमध्ये आम्ल आणि साखर असल्याने, विशेषतः बेकिंग सोड्यासोबत वापरल्यास, दातांवरील मुलामा हळूहळू कमी होऊ शकतो, ज्यामुळे दातांचे नुकसान होण्याची शक्यता असते. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
मुलाम्याचा थर एकदा कमी झाला की, तो परत तयार होत नाही, त्यामुळे संवेदनशीलता, पिवळेपणा आणि दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
डॉ. मोटवानी म्हणतात की, फळांवर आधारित नैसर्गिक पांढरेपणा आणण्याच्या उपायांचा दीर्घकाळ अवलंब करणे टाळावे. कारण- त्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
दात पांढरे करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती म्हणजे हायड्रोजन पॅरोक्साइड किंवा कार्बामाइड पॅरोक्साइडसारखे व्यावसायिक जेल वापरणे, जे आतून डाग नष्ट करते. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
रंगीत पदार्थ जसे हळद, काळी कॉफी व काळा चहा यांचा वापर मर्यादित करावा. तोंडाची व्यवस्थित स्वच्छता राखणे आणि सौम्य टूथपेस्ट वापरणे यांद्वारे दातांच्या आरोग्यास मदत मिळते. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
सफरचंद, सेलेरी यांसारखी फळे आणि भाज्या प्लेक कमी करण्यास मदत करतात; पण त्यामुळे दातांच्या रंगावर फारसा फरक पडत नाही, असे डॉ. मोटवानी स्पष्ट करतात. (छायाचित्र: फ्रीपिक)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल