-
तूप हे भारतीय जेवणातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे अत्यंत लाभदायक मानले जाते.
-
योगगुरूंचा सल्ला:
योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने शरीर आणि मन दोन्ही मजबूत होतात. त्यांनी यूट्यूबवर याबाबत खास व्हिडीओ शेअर केला आहे. -
मेंदू आणि स्मरणशक्ती:
तुपात फॅटी अॅसिड्स असतात, जे मेंदूच्या न्यूरॉन्सना बळकटी देतात. त्याचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. -
डोळे, त्वचा आणि हाडे:
तुपातील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्वचेला चमक देतो, कोरडेपणा दूर करतो आणि हाडे व स्नायू मजबूत करतो. -
सांधे आणि रोगप्रतिकारक शक्ती:
तूप सांधेदुखी कमी करते आणि शरीराला रोगांशी लढण्याची ताकद देते. -
आयुर्वेदानुसार फायदे:
तूप तिन्ही दोष वात, पित्त आणि कफ संतुलित करते. पचनसंस्थेला मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. -
सकाळी तूप खाण्याची पद्धत:
सकाळी २ चमचे शुद्ध गायीचे तूप थोडे कोमट करून घ्या, त्यात चिमूटभर मीठ टाका आणि नंतर २ ग्लास कोमट पाणी प्या. -
तूप सेवन करताना खबरदारी:
तूप नेहमी शुद्ध व सेंद्रिय असावे. जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा यकृताचे आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे.

“कृपया…” पुणेकरांचा विषय हार्ड! आता D-Mart मध्ये लावली अशी पाटी की, वाचून तुम्हीही पोट धरून हसाल