-
श्रावण (Shravan 2025) महिन्यात येणाऱ्या सणांपैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) एक आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
भगवान श्रीकृष्णाची जयंती (Shree Krishna Jayanti) कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते.
-
या काळात अनेक मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी (Lord Krishna) साजरी केली जाते.
-
सर्वात आधी श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक आणि नंतर जलाभिषेक केला जातो.
-
अभिषेक करताना कृष्णाच्या मंत्राचा जप केला जातो. ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः, ॐ कृं कृष्णाय नमः, क्लीं ग्लौं क्लीं श्यामलांगाय नमः, ॐ नमः भगवते श्रीगोविन्दाय:
-
जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेऊन सुंदर वस्त्र, अलंकार घालून त्यांना सजवले जाते आणि नंतर त्यांना गंध, अत्तर, पुष्प, धूप, दीप, तुळस अर्पण केले जाते.
-
श्रीकृष्णांना पाळण्यात घालून भजन म्हटले जाते. तसेच आरती करून त्यांच्या स्तोत्र आणि मंत्रांचा जप केला जातो; लाडवाचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जाते.
-
कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत करतात. अनेक लोक सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात.
-
विशेषतः महाराष्ट्रात ‘दहीहंडी’ हा कार्यक्रम कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी होतो.
-
या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”