-
आपल्यापैकी बरेच जण दिवसात किमान कपभर तरी नक्कीच चहा घेत असतील, तर काही जण त्यापेक्षा जास्त चहा घेत असतील. पण दूध घातलेल्या चहाचे सेवन मर्यादीत केले पाहिजे कारण जास्त झाल्यास याचे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. हायड्रेशन खराब होणे ते हार्मोन्सवर वाईट प्रभाव पडणे असे अनेक तोटे होऊ शकतात. (फोटो- pixabay)
-
काही जज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिवसातून १-२ कप चहा पिल्याने शरीराला नुकसान होत नाही. चहामुळे आरोग्याला हानी पोहोचू नये म्हणून, तो बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. (फोटो- pixabay)
-
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चहा कधीच प्लास्टीकच्या चाळणीने गाळू नये, असे केल्याने प्लास्टिक कंपाउन्ड्स गरम चहामध्ये मिसळतात आणि हे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. गरम चहा प्लास्टीकच्या चाळणीने गाळल्यास तुमच्या हार्मोनल हेल्थला धोका पोहचू शकतो. (फोटो- pixabay)
-
चहा पुन्हा गरम करून पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरते, जर तुम्ही चहा पुन्हा-पुन्हा गरम करत असाल तर त्यामध्ये अॅसिडचे प्रमाण वाढते. यामुळे अॅसिडीटी होऊ शकते, तसेच डायजेशन देखील बिघडू शकते. (फोटो- pixabay)
-
विशेषतः चहा तयार करून ३-४ तास झाले असतील तर त्याला पुन्हा गरम करून पिण्याचा चूक करू नका. (फोटो- pixabay)
-
चहा बनवताना पहिल्यांदा दूध घालू नका. दुधात असलेले प्रोटिन चहामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्सना बांधून ठेवतात आणि ते शरीरात शोषले जाण्याचा वेग काहीसा कमी होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा चहाची पावडर पाण्यात उकळा आणि नंतर त्यामधे दूध घाला. (फोटो- pixabay)
-
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिवसातून १-२ वेळापेक्षा जास्त चहा पिऊ नका. रिकाम्या पोटी चहा पिऊ नका आणि चहा पिण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्या जेणेकरून अॅसिडिटी होणार नाही. (फोटो- pixabay)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”