-
अर्जुन तेंडुलकर फिटनेस डाएट : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरचे नाव कायमचे सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने लोकांच्या नजरेत एक वेगळे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अर्जुनने २०१८ मध्ये भारतीय अंडर-१९ संघासाठी पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने मुंबईसाठी टी-२० क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर, गोव्यासाठी खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकल्याने तो चर्चेचा विषय बनला. (छायाचित्र: arjuntendulkar24/insta)
-
यासोबतच अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. आता अर्जुन तेंडुलकरने त्याच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केला आहे. अलिकडेच त्याचा मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी साखरपुडा झाला आहे त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरच्या फिटनेसचे रहस्य सर्वांना जाणून घ्यायचे आहे. (फोटो: arjuntendulkar24/insta)
-
अर्जुनची उंची ही सहा फूट तीन इंच आहे. यासोबतच अर्जुन तेंडुलकर त्याची फिटनेस राखण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तो दररोजच्या जेवणात काय खातो, तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते व्यायाम करतो आणि तो स्वतःला कसे फिट ठेवतो ते आपण जाणून घेऊया. (फोटो: arjuntendulkar24/insta)
-
अर्जुन तेंडुलकरचा आहार : अर्जुनचा आहार खूप साधा पण पौष्टिक आहे. त्याच्या जेवणात नेहमीच भरपूर प्रथिने असतात. डाळ, भाज्या, भात, पॉली, दही, चिकन, मासे आणि फळे हे त्याच्या दैनंदिन आहाराचा भाग आहेत. (फोटो: arjuntendulkar24/insta)
-
प्रथिनांसाठी तो ड्रायफ्रुट्स, दूध आणि फळांचे रस पितो. तो जंक फूड पूर्णपणे टाळतो आणि फक्त घरी बनवलेले जेवणच खातो. पुरेसे पाणी पिणे आणि वेळेवर जेवण करणे हे त्याच्या फिटनेसचे मुख्य रहस्य आहे. (फोटो: arjuntendulkar24/insta)
-
अर्जुनचे फिटनेस गुपित: अर्जुन लहानपणापासूनच तंदुरुस्त आहे, ज्यासाठी तो कधीही तीन गोष्टींशी तडजोड करत नाही. ज्यामध्ये दररोज व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा समावेश आहे. प्रवासादरम्यानही तो व्यायाम करणे आणि पौष्टिक अन्न खाणे थांबवत नाही. (फोटो: arjuntendulkar24/insta)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार अर्जुन तेंडुलकर त्याच्या वर्कआउट्सपूर्वी आणि नंतर कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खातो, त्याच्या आहारात आणि फिटनेस रूटीनमध्ये वेटलिफ्टिंग, व्यायाम इत्यादींचा समावेश आहे, ज्यामुळे त्याची उंची वाढली आहे. (फोटो: arjuntendulkar24/insta)

CJI B R Gavai : लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल