-
चमकदार त्वचेसाठी वेलचीचे पाणी
वेलची तिचा सुगंध आणि मसाल्यातील वापर यांमुळे प्रसिद्ध आहे. पण, त्वचेची काळजी घेण्यासाठीही तिचा वापर खूप फायदेशीर ठरतो. वेलचीचे पाणी नियमित प्यायल्याने त्वचा उजळते आणि तजेलदार दिसते. -
त्वचेला मिळणारे फायदे
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म मुरूम, काळे डाग आणि अकाली वृद्धत्व कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. -
कसे बनवावे वेलची पाणी?
एका लिटर पाण्यात तीन वेलची उकळा. पाणी गाळून, त्यात एका लिंबाचा रस आणि किसलेला खजूर घाला. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास शरीर शुद्ध होते आणि त्वचेला ताजेपणा मिळतो. -
तोंड आणि दातांसाठी फायदेशीर
वेलचीचे पाणी दुर्गंधी कमी करण्यास मदत करते. ते दातांवरील बॅक्टेरिया व जंतू दूर करून तोंडाची स्वच्छता राखते. -
शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त
हे पाणी पचनशक्ती सुधारते आणि पोषक घटकांचे शोषण व्यवस्थित करते. त्यामुळे पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात आणि शरीर हलके व ताजेतवाने वाटते.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”