-
वापरलेल्या तेलाचा नवा उपयोग अनेकांना प्रश्न पडतो की पुरी, फ्रेंच फ्राईज, चिकन किंवा मच्छी तळल्यानंतर उरलेले तेल फेकून द्यावे की पुन्हा वापरावे? याबाबत आता स्पष्ट मार्गदर्शन समोर आले आहे. (Photo: Unsplash)
-
किती वेळा वापरावे? उरलेले तेल एकदा पुन्हा वापरणे योग्य आहे; पण उरलेले तेल दोन-तीन वेळांपेक्षा जास्त वापरल्यास त्यात हानिकारक घटक निर्माण होतात. त्यामुळे आरोग्याचा धोका वाढतो. (Photo: Pexels)
-
तेल स्वच्छ कसे करावे? तेल पुन्हा वापरण्यापूर्वी थंड होऊ द्यावे. त्यानंतर ते गाळणीद्वारे गाळावे, जेणेकरून त्यातील कण आणि घाण वेगळी होईल. मगच हे तेल हलकेसे गरम करून स्वच्छ डब्यात साठवावे. (Photo: Meta AI Image)
-
बेकिंग ट्रेवर उपयोग उरलेल्या तेलाचा उपयोग बेकिंग ट्रेवर कोटिंगसाठी करू शकता. मात्र, तेलाचा रंग काळसर झाला असेल, तर त्याचा वापर टाळावा. (Photo: Freepik)
-
फर्निचर पॉलिशसाठी उरलेल्या तेलात थोडेसे व्हिनेगर मिसळून फर्निचर पॉलिश करता येते. त्यामुळे धूळ-घाण निघून जाते आणि फर्निचरची चमक व आयुष्य वाढते. (Photo: Pexels)
-
दिवा लावण्यासाठी जुने लोक घरात दिवा लावण्यासाठी तेल वापरत असत. आजही सजावटीच्या दिव्यांमध्ये उरलेले तेल वापरून, दिवा लावता येतो. (Photo: Pexels)
-
आरोग्याचा धोका तेल काळसर झाले, त्याला वास येऊ लागला किंवा त्यात फुगे दिसू लागले, तर असे तेल पुन्हा वापरू नये. ते आरोग्यास गंभीरपणे हानिकारक ठरू शकते. (Photo: Unsplash)
-
योग्य काळजी आवश्यक थोडक्यात उरलेल्या तेलाचा योग्य उपयोग करता येतो; पण काळजी घेतली नाही तर ते आजारांना निमंत्रण देऊ शकते. म्हणूनच त्याचा वापर विचारपूर्वक करावा. (Photo: Meta AI Image)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा