-
बद्धकोष्ठता ही पचनक्रियेतील सर्वांत सामान्य तक्रार आहे. अनेकदा लोक औषधे घेतात; पण कधी कधी साधे पदार्थ एकत्र केल्याने चमत्कार होऊ शकतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
किम्स हॉस्पिटल्सच्या डॉ. गुलनाज शेख यांच्या मते, पपई, चिया बिया व थोडीशी दालचिनी हे संयोजन बहुतेक लोकांसाठी खूप प्रभावी ठरू शकते. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
पपईमध्ये फायबर जास्त आहे आणि त्यात पपेन नावाचा एंझाइम असतो, जो पचनास मदत करतो आणि बद्धकोष्ठता रोखतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
चिया बिया विरघळणारे फायबर देतात, जे भिजवल्यावर मोठे होऊन मल मऊ करतात, ज्यामुळे मल बाहेर पडणे सोपे होते. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
दालचिनी केवळ चवच वाढवत नाही, तर पचनक्रियेलाही उत्तेजित करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. (छायाचित्र: पिक्साबे)
-
हे मिश्रण सातत्याने घेतल्यास आतड्यांच्या हालचाली नियंत्रित होऊन, मलाचे कडक होणे टळून, बाहेर पडणे सोपे होते. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
डॉ. शेख यांचा सल्ला – चिया बियांसारखे फायबरयुक्त पदार्थ घेताना पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. संवेदनशील पोट किंवा अॅलर्जी असलेल्या लोकांनी त्याचा कमी प्रमाणात वापर करून पाहावे. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
या संयोजनासोबत योग्य हायड्रेशन आणि आरोग्यदायी आहार घेतल्यास पचनसंस्था व्यवस्थित राहते आणि दररोज हलकेपणाचा अनुभव येतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)

CJI B R Gavai : लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल