-
निरोगी दृष्टी, चमकदार त्वचा व मजबूत रोगप्रतिकार शक्ती यांसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपण गाजर आणि पालकाचा विचार करतो; पण तेवढ्यावरच मर्यादित राहू नये. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, जे व्हिटॅमिन एने समृद्ध असूनही आपण त्यांना कमी लेखतो. (फोटो: फ्रीपिक)
-
राजगिऱ्याची पाने
भारतीय आहारातील पारंपरिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक म्हणजे राजगिरा. व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण ही पालेभाजी डोळ्यांचे आरोग्य जपते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि शरीराला नैसर्गिक ताजेतवानेपणा देते. -
लाल पाम तेल
दररोजच्या स्वयंपाकात फारसे न वापरले जाणारे लाल पाम तेल हे बीटा-कॅरोटीनचा अत्यंत समृद्ध नैसर्गिक स्रोत आहे. हे तेल शरीरात व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होऊन, त्वचेचे आरोग्य, दृष्टी आणि रोगप्रतिकार शक्तीला खास फायदा करून देते. -
शेवग्याची पाने
शेवग्याची पाने (Moringa Leaves) व्हिटॅमिन एने परिपूर्ण असतात. ही पाने हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते. -
आवळा
सर्वसाधारणपणे व्हिटॅमिन सीचा खजिना म्हणून ओळखला जाणारा आवळा हा प्रत्यक्षात व्हिटॅमिन एचाही उत्तम स्रोत आहे. तो डोळ्यांचे आरोग्य जपतो, वयानुसार कमी होत जाणारी दृष्टी सुधारण्यास मदत करतो आणि रोगप्रतिकार शक्तीलाही बळकटी देतो. -
कॉडलिव्हर ऑइल
एक प्राचीन आणि विश्वासार्ह पूरक मानले जाणारे कॉड लिव्हर ऑइल हे व्हिटॅमिन ए आणि डीचे नैसर्गिक पॉवरहाऊस आहे. हे रोगप्रतिकार शक्तीला मजबुती देण्यासोबतच हाडे मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. -
भोपळ्याची पाने
अनेकदा दुर्लक्षित राहणारी भोपळ्याची पाने ही पौष्टिकतेचा खजिना आहेत. त्यात व्हिटॅमिन एसोबतच लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. ही पाने डोळ्यांचे आरोग्य सुधारतात, त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि शरीराची उर्जा पातळी वाढवतात.
Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम