-
बैठी जीवनशैली आणि वाईट आहार: टेबलावर बसून काम करणे आणि फास्ट फूड, साखर असलेली पेये आणि प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सवर जास्त अवलंबून राहणे हे अस्वास्थ्यकर वजन वाढणे, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन प्रतिरोधकता वाढवत आहे, जी हृदयरोगाची प्रमुख कारण आहेत.
-
दीर्घकालीन ताण (Chronic Stress) : शैक्षणिक किंवा कामाच्या ताणामुळे आणि सोशल मीडियामुळे सततचा ताण कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालाईनची पातळी वाढवतो, कालांतराने धमन्यांचे नुकसान करतो आणि हृदयविकाराच्या घटनांना बळी पडण्याची शक्यता वाढवतो
-
चांगल्या आरोग्याचा अभाव : अनियमित वेळापत्रक किंवा स्क्रीन वापरामुळे बिघडलेली झोपेची सवय यामुळे चयापचयात व्यत्यय येतो आणि रक्तदाब वाढतो. हे असंतुलन लठ्ठपणा आणि मधुमेहाला गती देते, हृदयविकाराच्या घटनांसाठी कारणीभूत ठरते.
-
धूम्रपान, व्हेपिंग आणि इतर गोष्टींचा वापर: तंबाखूमुळे धमन्यांच्या भिंती खराब होतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. कॅफिन आणि उत्तेजक घटकांचे जास्त प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक्स धोकादायक हार्ट रिदम निर्माण करू शकतात, विशेषतः हृदयरोगाबद्दल माहिती नसलेल्यांसाठी हे धोकादायक ठरू शकते.
-
निदान न झालेले आजार आणि अनुवांशिक घटक: अनेक तरुणांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा वारशाने मिळालेल्या इतर धोक्यांबद्दल माहिती नसते, जे अचानक हृदयविकाराच्या घटनांमध्ये परिणत होऊ शकतात.
-
अतिरेकी व्यायम आणि तंदुरुस्तीबाबतचे गैरसमज: योग्य पद्धतीने वैद्यकीय तज्ज्ञांकडून माहिती न घेता अतिरेकी व्यायम केल्याने हृदयावर ताण येऊ शकतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती ही विश्रांतीबरोबर संतुलित करणे आवश्यक आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा