-
मिरी पाण्याचा फवारा काळी मिरी पूड पाण्यात मिसळून भिंतींवर, खिडकीजवळ किंवा कोपऱ्यांत फवारणी केली की त्या ठिकाणी पाली येत नाहीत. मिरीचा तीव्र वास आणि तिखटपणा त्यांना अस्वस्थ करतो.
-
लसूण-कांद्याचा गंध पालींना तीव्र वास सहन होत नाही, म्हणून घराच्या कोपऱ्यात लसूण पाकळ्या किंवा कांद्याचे तुकडे ठेवल्यास त्या जागी पाल थांबत नाही. काही जण लसणाचा रस पाण्यात मिसळून स्प्रेही करतात.
-
अंड्याचे कवच उपाय अंड्याचे रिकामे कवच भिंतीजवळ किंवा खिडकीच्या चौकटीवर ठेवल्यास पाल त्या वासामुळे दुरूनच पळ काढते. कवच नेहमी कोरडे ठेवावे, नाहीतर दुर्गंधी होऊ शकते.
-
कॉफी-तंबाखूचे गोळे कॉफीच्या पुडीत थोडी तंबाखू मिसळून लहान गोळे तयार करून कोपऱ्यात ठेवा. या वासामुळे पाल दूर राहते. मात्र, हे उपाय करताना लहान मुलांपासून गोळे दूर ठेवावेत.
-
स्वच्छता घरात पाल मुख्यतः अन्नाचे तुकडे आणि कीटक शोधत येतात, त्यामुळे घर स्वच्छ ठेवणे, कीटक नियंत्रण करणे आणि खिडक्या-दरवाज्यांतील फटी सील करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
-
पुदिना, लेमनग्रास, युक्लिप्टस या वनस्पतींचा सुगंध पालींना अजिबात आवडत नाही. घराच्या खिडकीजवळ किंवा गॅलरीत ही झाडं ठेवल्यास पाल आत शिरत नाहीत.
-
आरोग्याचा धोका पाल निरुपद्रवी वाटतात, पण त्यांच्या विष्ठेमुळे सॅल्मोनेलासारखे जीवाणू पसरू शकतात. त्यामुळे पाल जिथे असतात तिथे अन्न ठेवू नये आणि नेहमी हात धुवावेत.
-
उन्हाळ्यात पाल का वाढतात? उष्णतेच्या काळात घरातील थंड कोपरे, अंधार आणि ओलसर जागा पालींना आकर्षित करतात. शिवाय या काळात घरात कीटकांची संख्याही वाढलेली असते, त्यामुळे पालींचे प्रमाण जास्त दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा