-
काही लोकांसाठी दूध पिणं फायदेशीर न ठरता, उलट त्याच्यां पचनसंस्था आणि त्वचेवर दुष्परिणाम करू शकतं. शरीरात दिसणारी काही सूक्ष्म लक्षणं सांगतात की, दूध तुमचं आरोग्य सुधारत नाही, तर बिघडवतंय. खालील सहा लक्षणांकडे लक्ष द्या. हीच तुम्हाला वेळेत मिळालेली सावधगिरीची सूचना असू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पोट फुगणं आणि गॅस : दूध प्यायल्यावर पोट फुगणं, गॅस होणं किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर ते लॅक्टोज न पचल्याचं लक्षण असू शकतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
नाक बंद होणं आणि कफ साचणं : दूध घेतल्यानंतर वारंवार नाक बंद होणं, घशात कफ साचणं किंवा सायनस वाढणं हे दुधातील प्रोटीन्सना शरीराकडून व्यक्त केली गेलेली प्रतिक्रिया असू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
वारंवार डोकेदुखीचा त्रास होणं : दुधामुळे काही लोकांना डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास वाढतो. हे दुधातील प्रोटीन्समुळे होऊ शकतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
थकवा आणि आळस जाणवणं : दूध घेतल्यानंतर सतत थकल्यासारखं वाटणं, झोप येणं किंवा विचारांमध्ये गोंधळ जाणवणं हे शरीरातील सौम्य अॅलर्जीचं लक्षण असू शकतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
त्वचेवर मुरमं येणं : दुधामुळे काहींच्या त्वचेवर मुरमे किंवा सूज येते. दुधातील हार्मोन्स त्वचेवर परिणाम करू शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पोटात दुखणं किंवा जुलाब होणं: दूध घेतल्यानंतर पोटात दुखणं, मळमळ किंवा जुलाब होत असतील, तर त्याचा अर्थ शरीरात लॅक्टोज पचविण्यासाठी लागणारे एंझाइम कमी आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी