-
ठाणे रेल्वेस्थानकात सोमवारी हजारो स्थलांतरितांचे आगमन झाले. मात्र, यावेळी मनपाच्या नियोजनाच्या अभावामुळे अॅन्टिजेन तपासणी करून घेण्यासाठी या स्थलांतरितांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ( सर्व फोटो सौजन्य : दिपक जोशी )
-
ठाणे रेल्वेस्थानकात शिवाय मोठ्याप्रमाणावर गर्दी देखील झाली होती.
-
तपासणी करून घेण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास या स्थलांतरितांना रांगेत उभा राहवं लागत होतं. यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.
-
एवढ्यामोठ्या प्रमाणावर लोकं एकत्र असल्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता देखील अधिकच होती.
-
सोशलडिस्टंसिंगच्या नियामांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
-
काही नागरिकांच्या चेहऱ्यावर तर मास्क देखील नसल्याचे दिसून येत होते.
-
करोना लॉकडाउनमुळे कामधंदे ठप्प झाल्यानंतर हातचा रोजगार गमावलेले, शेकडो स्थलांतरित मजूर आपल्या गावी गेले होते.
-
आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर व उद्योग-व्यवसाय सुरू होऊ लागल्याने, शेकडो स्थलांतरित पुन्हा कामावर वापसी करण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल