-
बेल्जियमची राजधानी असणाऱ्या ब्रसेल्समध्ये करोनामुळे मागील सात ते आठ महिन्यांपासून सर्कसची प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा बंद होत्या. मात्र आता अनलॉकच्या कालावधीमध्ये सुपीरियर स्कूल ऑफ सर्कस आर्ट्सचे वर्ग पुन्हा सुरु झाले आहेत. (सर्व फोटो असेसिएट प्रेसवरुन (AP) साभार )
-
करोनामुळे सर्कस प्रशिक्षण बंद होते. मात्र आता ते पुन्हा सुरु झाल्यानंतर संपूर्ण काळजी घेत विद्यार्थ्यांनी तेथे घाम गाळण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण फेस मास्क घालूनच सराव करताना दिसत आहेत. लॉकडाउनच्या काळातील नियम शिथिल करण्यात आलेत. प्रशिक्षण वर्ग पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी सरावही सुरु केला आहे.
-
जगामधील सर्कसचा इतिहास खूप जूना आहे. प्राचीन रोममध्ये सर्कसची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर जिप्सी लोकांनी हा प्रकार युरोपमध्ये आला.
-
बेल्जियम आणि रशियामध्ये सर्कसला विशेष महत्व आहे. येथे सर्कसमध्ये काम करणं दुय्यम दर्जाचं काम मानलं जात नाही.
-
भारतामध्ये सर्वात लोकप्रिय आणि जुन्या असा रॅम्बो सर्कसला करोनाचा मोठा फटका बसला आहे. रॅम्बो सर्कसमधील कलाकारांना आर्थिक मदत पोहचवण्याच्या दृष्टीने आता डिजीटल माध्यमातून सर्कस प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय