-
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम हटवण्यात आल्याने साताऱ्यातील तरुणाचा फायदा झाला आहे.
-
भारतीय सैन्यातील जवान अजित पाटील यांनी काश्मीरच्या सुमन देवीसोबत लग्नगाठ बांधली असून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
अजित प्रल्हाद पाटील कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी आहेत.
-
तर सुमन देवी जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावातील आहे.
-
एका मित्राच्या घरी अजित पाटील आणि सुमन देवी यांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
-
सुमन देवीच्या नातेवाईकांसोबत जम्मू काश्मीरला गेले असता अजित पाटील लॉकडाउनमुळे तिथेच अडकले होते. यानंतर त्यांच्यातील नातं अजून घट्ट झालं.
-
अजित पाटील आणि सुमन देवी यांनी आधी किश्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने लग्न केलं. नंतर साताऱ्यात महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करण्यात आलं.
-
३७० कलममुळे अजित पाटील आणि सुमन देवी यांना आपला विवाह कसा होणार याची चिंता होती. पण कलम हटलं आणि यासोबत त्यांच्या लग्नातील मोठा अडथळाही दूर झाला.
-
सरकारने ३७० कलम हटवल्यानेच आपण लग्न करु शकलो अशी भावना अजित पाटील यांनी व्यक्त केली आहे.
-
माझ्यासाठीच कलम हटवल्याची भावनाही अजित पाटील यांनी व्यक्त केली.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात