-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार झाला आहे.
मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दीपक म्हात्रे यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. या हल्ल्यातून दीपक म्हात्रे थोडक्यात बचावले आहेत. गोळ्या चुकवल्याने त्यांना एकही गोळी लागली नाही. दीपक म्हात्रे हे पत्नीसह वैयक्तिक कामासाठी ठाण्यात गेले होते. रात्री उशीरा घरी आल्यानंतर गाडी पार्क केली. तेव्हाच अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. दीपक म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली आणि पत्नीलाही सुरक्षित ठिकाणी नेहलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया