-
भारतीय संघातील माजी खेळाडू आणि सध्या दिल्लीमधून खासदार असणारा गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आहे. मंगळवारी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी ट्विटरवर गंभीरचीच चर्चा होती.
-
अचानक गंभीर चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्याने आपल्या खासदार निधीमधून पूर्व दिल्लीमध्ये दुसरी जन रसोई सुरु केली आहे.
-
समाजातील गरीब आणि गरजूंना अन्न पुरवण्यासाठी गंभीरने जन रसोईची मोहिम सुरु केली असून या जन रसोईच्या दुसऱ्या केंद्राचं उद्घाटन त्याने काल केलं.
-
स्वच्छ, पौष्टिक आणि परवडेल अशा दरात म्हणजेच अवघ्या एका रुपयामध्ये गरजू व्यक्तींना जेवणं देणं हा जन रसोई योजनेचा मुख्य हेतू आहे.
-
यापूर्वी गंभीरने पूर्ण दिल्लीमधील गांधी नगर मार्केट परिसरामध्ये जन रसोईची पहिली शाखा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सुरु केली होती.
-
डिसेंबरपासून आतापर्यंत या पहिल्या जन रसोई केंद्रामधून ५० हजार जणांना जेवण देण्यात आल्याचा दावा गंभीरच्या कार्यालयामधून जारी करण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.
-
दुसरं जन रसोई केंद्र हे न्यू अशोक नगर येथे सुरु करण्यात आलं आहे. या केंद्रामध्ये एका वेळेस ५० जणांना जेवण पुरवलं जाईल.
-
जन रसोई केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे उप राष्ट्रीय अध्यक्ष बिजयंत पांडा आणि दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता हे सुद्धा उपस्थित होते.
-
हा एक ऐतिहासिक क्षण असून दिल्लीमध्ये अशाप्रकारची सेवा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारे कमी दरामध्ये जेवण दिलं जातं. मात्र दिल्लीत असा उपक्रम यापूर्वी कधीही राबवण्यात आला आहे. मी या कामासाठी खासदार गंभीर यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दांमध्ये पांडा यांनी गंभीरच्या कामाचं कौतुक केलं.
-
या जन रसोईच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला काल पूर्व दिल्लीमध्ये कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी झाली होती.
-
पेट भरा हो तो इंसान दुनिया की किसी भी ताकत से भिड़ सकता! दिल्ली को प्रचार नहीं, आहार चाहिए! , अशा कॅप्शनसहीत गंभीरनेही या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
जन रसोईमध्ये स्वस्तात मस्त खाण्याचा आनंद घेणाऱ्या मुलांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
-
त्याचप्रमाणे गरजू व्यक्ती या जन रसोईमध्ये एका रुपयात मिळणाऱ्या जेवणाचा लाभ घेतानाचे फोटोही ट्विटरवर शेअऱ केले जात आहे.
-
एका रुपयामध्ये या प्लेटमध्ये भात, आमटी आणि सॅलेड दिलं जातं.
-
जन रसोई केंद्रामध्ये गंभीरचे मोठे फोटो लावण्यात आलेत.
-
या जन रसोईमध्ये दिवसाला ठरावी संख्येने खाण्याच्या प्लेट तयार करुन त्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर गरजूंना एका रुपयात उपलब्ध करुन दिल्या जातात.
-
गंभीरने सुरु केलेल्या या जन रसोईसाठी सोशल नेटवर्किंगवर त्याचं कौतुक होताना दिसत आहे.
-
मस्त काम करताय सर असं एकाने म्हटलं आहे.
-
गंभीर म्हणजे मॅन विथ गोल्ड हार्ट आहे, अशा शब्दात अन्य एका चाहत्याने गंभीरचं कौतुक केलं आहे.
-
गंभीर हा खरा हिरो असल्याचं एकानं म्हटलं आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?