-
पुणे महानगरपालिकेने बुधावारी शहरातील एफसी रोडवरील अनधिकृत बांधकांमाविरोधात कारवाई केली. (सर्व फोटो: आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
पीएमसीने केलेल्या या कारवाईमध्ये जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृतपद्धतीने फुटपाथवर उभारण्यात आलेले बांधकाम पाडण्यात आलं.
-
यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
-
एफसी रोड हा पुण्यामधील तरुणाईसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. वेगवेगळ्या गोष्टींच्या खरेदीपासून ते खाण्याच्या दुकानांपर्यंत अनेक गोष्टी या परिसरामध्ये असल्याने येथे तरुणाईचे कायमच वर्दळ असते.
-
बुधवारी पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही महापालिकेकडून बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?