-
राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना जामीन देण्यासंदर्भातील निर्णय आज झारखंडमधील उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगवासात असलेल्या लालू यांची प्रकृती मागील काही आठवड्यांपासून खालावली असल्याने त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. याचसंदर्भातील सुनावणी आज होणार आहे.
-
दरम्यान यापूर्वीच लालू यांचे धाकटे पुत्र तेजप्रताप यादव यांनी गुरुवारी पाटण्यामधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तब्बल ५० हजार पत्रं पाठवली आहेत. लालू समर्थकांनी लालू प्रसाद यादव यांची तुरुंगामधून सुटका करावी अशी मागणी करण्यासाठी ही पत्र पाठवली आहेत.
-
आझादी पत्र असं या पत्रांना नाव देण्यात आलं असून चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेल्या लालू यांना प्रकृतीसंदर्भातील समस्या लक्षात घेता दिलासा देत तुरुंगातून मुक्त करावे अशी मागणी या पत्रांमधून करण्यात आली आहे.
-
आम्ही लालू यांच्या समर्थकांकडून लिहिण्यात आलेली ही आझादी पत्र गोळा करत आहोत. ही मोहीम लालू यांची सुटका होईपर्यंत सुरु राहणार आहे, असं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं आहे.
-
लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी काही आठवड्यापूर्वी लालू यांची भेट घेतल्यानंतर दिली होती. रांचीतील ‘रिम्स’मधून लालू यांना दिल्लीतील एम्समध्ये हलवण्यात आलं आहे. (फोटो: पीटीआय, एएनआय आणि ट्विटरवरुन साभार)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा