-
मेक्सिरोमधील सिनालोओ (Sinaloa) येथील एका धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये प्रियकराने प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये प्रेयसीला चाकूने भोसकलं आहे. हल्ला होत असताना महिला मदतीसाठी ओरडत होती, पण एकही प्रवासी मदतीसाठी पुढे आला नाही. बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही सर्व थरारक घटना कैद झाली आहे.
-
पीडित ३३ वर्षीय महिलेला भेटण्यासाठी तिचा माजी प्रियकर पोहोचला होता. यावेळी अचानक त्याने हल्ला केला. प्रियकराने चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली आणि तब्बल ३० वेळा भोसकलं.
-
महिलेवर हल्ला झाला तेव्हा बस प्रवाशांनी भरलेली होती, पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. हल्ल्यावेळी महिला वारंवार मदतीसाठी ओरडत असतानाही कोणी त्याची दखलही घेतली नाही.
-
विशेष म्हणजे महिलेवर ३० वेळा वार करण्यात आल्यानंतरही तिचा जीव वाचला आहे. थंडी असल्यामुळे महिलेने जाड जॅकेट घातलं होतं. यामुळे हल्ल्यात महिलेला जास्त इजा झाली नाही.
-
मात्र हल्ल्यात महिलेच्या चेहऱ्याला आणि खांद्याला जखमा झाल्या आहेत. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे.
-
महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रिपोर्टनुसार, पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

‘काकूबाई, जरा थांबा…’, भररस्त्यात ‘ही नवरी असली’ गाण्यावर महिलेचा तुफानी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक