-
रायगडमध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर मोठी दुर्घटना टळली आहे.
-
सोमवारी सकाळी खासगी आराम बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. बोरघाटात एका ढेकू गावाजवळ एका तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे बस कठडे तोडून दरीच्या दिशेने सरकली.
-
अपघातानंतर बस सुमारे ६० फूट खोल दरीत कोसळणार होती.
-
मात्र एका उंबराच्या छोट्या झाडावर बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.
-
घटनेची माहिती मिळताच बोरघाट टॅपचे पोलीस निरीक्षक परदेशी, उपनिरीक्षक महेश चव्हाण वाहतुक पोलीसांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
-
या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. आयआरबी यंत्रणांनी बस बाजूला करून वाहतुक सुरळीत करून दिली.

अमिताभ बच्चन यांना ४.५ कोटींची रोल्स रॉयस भेट दिल्याने दिग्दर्शकाला आईने कानाखाली मारलेली, म्हणाला…