-
स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना, त्यांनी भारताच्या उभारणीत घेतलेल्या निर्णयांना उजाळा दिला जात आहे. विविध राजकीय नेत्यांसह सामाजिक, शैक्षणिक आणि कला-साहित्य क्षेत्रातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेल्या त्यांच्या कारकीर्दीतील काही खास क्षणचित्रे… (सर्व फोटो सौजन्य : Express Archives)
-
१४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री जवाहरलाल नेहरू यांनी भाषण केले त्यावेळी टिपटलेले छायाचित्र.
-
पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी
-
दलाई लामा यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरूंचे २२ मे १९६४ रोजी टिपलेले छायाचित्र.
-
विधानसभा सत्रात चर्चा करताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद.
-
कराचीमधील रस्त्यांवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासह पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान.
-
इंदिरा गांधी, डॉ. राधाकृष्णन आणि पंडित जवाहरलाल नेहरू
-
लंडन ब्युरो येथे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मि. हॉलंड गाइडहॉल येथे गार्ड ऑफ हॉनरची तपासणी करताना.
-
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी जॅकलीन केनेडी ओनॅसिस यांचे स्वागत करताना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू.
-
पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे नातू राजीव, संजय गांधी या छायाचित्रात दिसतात.
-
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पुष्पहार घालताना अभिनेत्री मीना कुमारी.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक