-
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी लखनऊमध्ये निधन झाले. ते राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले होते. १९९० दशकात उत्तर प्रदेशात भाजपचा प्रचार-प्रसार करण्यात आणि सत्ता स्थापनेत सिंह यांचा मोलाचा वाटा होता. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली, तेव्हा कल्याण सिंह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. मशीद पाडल्याप्रकरणी दोषमुक्त केलेल्या ३२ जणांमध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह कल्याण सिंह यांचाही समावेश होता. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
राजकारणात येण्यापूर्वी कल्याण सिंह हे अलिगढ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. तसेच त्यांच्या मुळ गावी ते कुस्तीदेखील खेळायचे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कल्याण सिंह यांना उत्तर प्रदेशामध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली होती.
-
कल्याण सिंह यांनी आपल्या कुस्तीच्या कौशल्यांचा वापर राजकारणासाठी केला. एकेकाळी ते हिंदुत्वाचे पोस्टर बॉय होता. कल्याण सिंह यांच्यामुळे लोध समाजाला नेतृत्व मिळालं. कल्याण सिंह यांचा प्रभाव फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर मध्य प्रदेशातही आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
इंदिरा गांधीच्या सरकारने लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात अटक झाल्यानंतर कल्याण सिंह यांचा राजकारणात उदय झाला. २१ महिन्यांनी सुटका झाल्यानंतर १९७७ मध्ये जनता पक्षाच्या आघाडीने अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केले. तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री झाले.
-
कल्याण सिंह भारतीय जनसंघाच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष होते. जनता पक्षाचा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर १९८०मध्ये भारतीय जनसंघाचा भारतीय जनता पक्ष म्हणून पुनर्जन्म घेतला. याच दशकात भाजप अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मोहिमेत सहभागी झाले आणि लालकृष्ण अडवाणी यांना अयोध्या मोहिमेचा चेहरा करण्यात आलं.
-
कल्याण सिंह हे भाजपसाठी योग्य क्षणी योग्य व्यक्ती होते. अयोध्येतील राम मंदिर बांधकामाच्या मोहिमेचे ते कट्टर समर्थक होते. त्याला उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचा तीव्र विरोध होता. हीच संधी साधून कल्याण सिंह यांच्या नेतृत्वात भाजपने एकात्मा यात्रा सुरू केली. एकतेचं प्रतीक दर्शवण्यासाठी भाजप नेते देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन नद्यांमधील पाणी भरून इतर नद्यांमध्ये ओततील, असा उद्देश या यात्रेचा होता.
-
या यात्रेच्या कोलकात्यातील रॅलीमध्ये लोकांनी अभूतपूर्व गर्दी पाहिली. त्यानंतर कल्याण सिंह जनमानसांत लोकप्रिय झाले. १९९१ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत ४२५ पैकी २२१ जागा जिंकल्या आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अयोध्येत जाऊन तिथं राम मंदिर बांधण्याचं त्यांनी वचन दिलं. अगदी सहा महिन्यांच्या आत कल्याण सिंह सरकारने बाबरी मशीद संकुलाच्या आसपास २.७७ एकर जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली. २०१९च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात ही जमीन राम मंदिर ट्रस्टकडे गेली. (फोटो – एएनआय)
-
बाबरी मस्जिद विध्वंसानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत कल्याण सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कल्याण सिंह बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील एक आरोपी ठरवण्यात आलं होतं. २०१९च्या निकालात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
-
भाजपमधून काढल्यानंतर कल्याण सिंह यांनी राष्ट्रीय क्रांती दल नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि २००२ ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात जोरदार प्रचार केला आणि त्यांच्या पक्षाने चार जागा मिळवत ७० पेक्षा जास्त जागांवर भाजपाला नुकसान पोहोचवलं. २००३मध्ये ते समाजवादी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र, त्यांची सपासोबतची मैत्री जास्त काळ टिकली नाही आणि जवळपास पाच वर्षांनी २००४ मध्ये ते पुन्ह भाजपवासी झाले.
-
२००७मध्ये पुन्हा भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवत निवडणूक लढवली पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे अगदी तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये परतलेल्या सिंह यांनी पुन्हा २००९मध्ये सपासोबत हातमिळवणी केली आणि लोकसभेत खासदार झाले. ( फोटो – ट्विटर)
-
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी पुन्हा राष्ट्रीय क्रांती दलाचे तब्बल २०० उमेदवार उभे केले. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. पक्ष बदलण्याचा आणि ठाम राजकीय भूमिका नसल्याचा फटका त्यांना स्वतःच्या अतरौली मतदारसंघातही बसला. ज्या मतदारसंघातून कल्याण सिंह ८ वेळा निवडून आले होते त्या पारंपारिक अतरौली मतदारसंघात त्यांच्या सून प्रेमलता यांचा पराभव झाला. (फोटो एएनआय)
-
कल्याण सिंह २०१३मध्ये पुन्हा भाजपमध्ये परतले आणि त्यांनी राष्ट्रीय क्रांती दल या पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरण केलं. त्यानंतर ते अखेरपर्यंत भाजपमध्ये राहिले. कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो सौजन्य – ट्विटर)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग