-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२५ नोव्हेंबर) उत्तर प्रदेशमधील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. हे विमानतळ कसं असणार याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. त्याचं प्रस्तावित डिझाईन असं असणार आहे.
-
हे विमानतळ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होईल असं अपेक्षित आहे. हे दिल्ली एनसीआरमधील अशाप्रकारचं दुसरं विमानतळ आहे.
-
नोएडा विमानतळ जवळपास ५,००० एकर जमिनीवर विकसित होणार आहे. याचा अंदाजित खर्च २९,५६० इतका आहे.
-
या विमानतळाविषयी बोलताना केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असेल.
-
हे विमानतळ नवी दिल्लीपासून १०० किलोमीटर अंतरावर असणार आहे.
-
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हजर होते.
-
जेवर येथे झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली. यावेळी मोदी मोदीच्या घोषणांही ऐकायला मिळाल्या.

Plane Crash one Passenger Survived: चमत्कार! भीषण विमान अपघातामधून ११अ सीटवर बसलेले रमेश विश्वासकुमार सुखरुप वाचले