-
तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला.
-
जनरल बिपिन रावत हे ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला.
-
जनरन बिपिन रावत हे भारतीय संरक्षण दलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) होते.
-
३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी, ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ते लष्करप्रमुख होते.
-
जनरन बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला.
-
जनरन बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे.
-
वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं.
-
त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले.
-
या अकादमीमधील त्यांची चमकदार कामिही पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिलं सन्मानपत्र मिळालं. त्यानंतर बिपिन रावत यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.
-
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.
-
१६ डिसेंबर १९७८ रोजी बिपिन यांचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
-
त्यांना भारतीय लष्कराच्या गोरखा १ रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून संधी मिळाली.
-
इथूनच त्यांचा लष्करामधील कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. इथे जनरन रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.
-
आपल्या लष्करी सेवेदरम्यान बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत.
-
त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा