-    जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे देहू परिसरातील भंडारा डोंगर येथे भव्यदिव्य असे मंदिर बांधण्यात आहे. 
-    हे मंदिर अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीरामाच्या मंदिरात प्रमाणेच आहे. 
-    दोन्ही मंदिरांसाठी एकाच खाणीतील दगड वापरण्यात येत आहेत. 
-    या मंदिर वास्तुशास्त्रदेखील एकच आहे. तसेच, कामगार, आर्किटेक्टदेखील एकाच ठिकाणचे आहेत. 
-    तुकोबांचे मंदिर हे लोकवर्गणीतून उभा राहात असून २०२५ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती भंडारा डोंगरचे ट्रस्टी बाळासाहेब काशीद यांनी दिली. 
-    विशेष म्हणजे गुजरातमधील अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जात आहे. या मंदिरांची नेमकी वैशिष्टे काय आहेत? ती बघूया. 
-    या मंदिराची लांबी १७९ फूट, उंची १०८ फूट तर रुंदी १९३ फूट इतकी भव्य आहे. 
-    या मंदिराला तीन भव्य कळस असतील. हे कळस ८७ ते ९६ फुटांचे असतील. 
-    या मंदिराच्या मंडपाची शोभा वाढवणारा घुमट हा ३४ फूट बाय ३४ फुटांचा असेल. तर गर्भगृह १३.५ फूट बाय १३.५ फूट इतका भव्य असेल. 
-    मंदिराला नऊ दरवाजे तसेच गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या असतील. 
-    या मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची आणि त्यांना पाहण्यात मग्न असणारे संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. 
-    २५ हजार स्क्वेअर फुटांत १२२ खांबावर (पिलर) हे भव्य दिव्य मंदिर उभं राहणार आहे. यासाठी अंदाजे १५० कोटी रुपयांचा याला खर्च येणार आहे. 
 
  23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  