-
इस्लामी कट्टरवादी गट हमासने इस्रायलवर गाझा पट्टीतून ५ हजार रॉकेट्स डागले. या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचं सायरन वाजलं. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाले.
-
पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अनेक पॅलेस्टिनी कट्टरतावादी गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आहेत.
-
हमासने केलेल्या हल्ल्यात १०० लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.
-
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ही ना कोणती मोहीम आहे, ना हा कुठला सामान्य गोळीबार आहे. हे युद्ध आहे. आपण युद्धात आहोत.”
-
“हमासच्या दहशतवाद्यांना अद्दल घडवली जाईल,” अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला ठणकावलं आहे.
-
इस्रायल लष्कराने सांगितल्यानुसार, हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन ‘आयर्न स्वॉर्डस’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्यमातून जमीन, समुद्र आणि हवाईमार्गे गाझा पट्टीत रॉकेट हल्ले करण्यात येत आहेत.
-
गाझा पट्टीतील दहशतवाद्यांच्या १७ तळांवर आणि ४ मुख्यालयांवर विमानांनी हल्ला केला, अशी माहिती इस्त्रायलच्या वायुसेनेनं दिली आहे.
-
इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात १९८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, शहरात सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे. “इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानं मला धक्का बसला आहे. आमची प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहे. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. ( सर्व फोटो सौजन्य – एपी )

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”