-
राज्यात विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. (All Photos- Express photo by Deepak joshi)
-
या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे.
-
दरम्यान आज सभागृह परिसरात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले.
-
नेमकं काय घडलं?
पेपरफुटी विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करून घोषणाबाजी करत होते. त्यांच्या हातात सरकारचा निषेध करणारे फलक होते तर पेपरफुटी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा पद्धतीच्या अनेक घोषणा विरोधक देत होते. यामध्ये विधानपरिषदेचे अध्यक्ष अंबादास दानवे, अनिल देशमुख, रोहित पवार, बाळासाहेब थोरात आणि आणि इतर सहकारी आमदार उपस्थित होते. -
नेमकं त्याचवेळेला सत्ताधारी आमदारांचा गट विधानभवनाच्या पायऱ्यांवर दाखल झाला.
-
त्यांच्याकडेही विविध फलक होते एक बॅनर होता. ज्यामध्ये २ दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील मुद्दे होते.
-
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी दिल्या.
-
सत्ताधारी आमदारांनी केलेल्या या विरोधातील घटनेमुळे संतापलेल्या विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले
-
पायऱ्यांवर बसून विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. दरम्यान, सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी दिली आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”