-
माघी गणेशोत्सवाला तब्बल सहा महिने झाले तरी पश्चिम उपनगरातील दोन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झाले नव्हते. (संग्रहित फोटो)
-
डहाणूकरवाडी येथील कांदिवलीचा श्री आणि कांदिवलीतील चारकोपचा राजा या दोन मंडळांच्या पीओपीच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन होणे बाकी होते. (Photo: Indian Express)
-
या दोन मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नकार दिला होता. त्यामुळे या गणपतींचे विसर्जन अद्याप होऊ शकले नव्हते. (Photo: Indian Express)
-
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे पश्चिम उपनगरातील माघी गणेशोत्सवातील दोन मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला. (Photo: Indian Express)
-
अखेर २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता या दोन्ही मूर्तींचे विसर्जन मिरवणूक निघाल्या व दरवर्षीप्रमाणे कांदिवलीतील डहाणूकर वाडी येथील नैसर्गिक तलावात विसर्जन पार पडले. (Photo: Indian Express)
-
माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेशमूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. (संग्रहित फोटो)
-
त्यामुळे माघी उत्सवाच्या अनेक गणेशमूर्तीचे विसर्जन रखडले होते. मुंबई महापालिकेने जास्तीत जास्त खोल असे कृत्रिम तलाव तयार केले होते. त्यात अनेक मंडळानी आपल्या गणेश्मूर्तीचे विसर्जन केले. मात्र मूर्तींची उंची जास्त असल्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास या मंडळांनी नकार दिला होता. (संग्रहित फोटो)
-
कांदिवलीच्या श्री मंडळाने आपली मूर्ती मंडपालगतच्या मैदानात झाकून ठेवली होती, तर चारकोपचा राजा या मंडळाने मूर्ती अज्ञातस्थळी झाकून ठेवली होती. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नी तोडगा निघेल या आशेवर या दोन मंडळांचे पदाधिकारी राज्य सरकार व न्यायालयीन सुनावणीकडे डोळे लावून बसले होते. (संग्रहित फोटो)
-
दरम्यान, २४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन समुद्रात व नैसर्गिक जलप्रवाहांत करण्यास परवानगी दिली आहे. (संग्रहित फोटो) हेही पाहा- मांजराच्या चाव्याने काय होते? ‘कॅट स्क्रॅच रोग’ काय आहे? काय असतात त्याची लक्षणं?

‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’, अमित शाहांनी मांडली तीन विधेयके