-
२९ जुलै रोजी विंडोज १० बाजारात येत आहे. विंडोज ७ आणि ८.१ आवृत्ती वापरणा-या ग्राहकांना नवीन आवृत्ती मोफत डाऊनलोड करता येईल. बघुया नवीन आवृत्ती कशाप्रकारे अपग्रेड करावी..(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )

विंडोज ७ आणि ८.१ आवृत्ती वापरणा-यांना ‘get windows 10 aap’ असा संदेश त्यांच्या मोबाईल, टॅब आणि संगणकावर दिसून येईल. विंडोजचे चिन्ह असलेला संदेश स्क्रिनच्या उजवीकडे खालच्या बाजूला दिसून येईल..(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट ) -
विंडोज ८ मधून काढून टाकलेला स्टार्ट ‘मेन्यू विंडोज १०’ कार्यान्वित झाल्यावर दिसून येईल….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )

विंडोज १० मध्ये अशाप्रकारे कोरटाना दिसून येईल. बनावट आवृत्या वापरणा-यांना विंडोज १० ची सेवा मोफत मिळणार नाही….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट ) -
‘विंडोज ७ होम’ आणि ८.१ आवृत्ती वापरणा-या ग्राहकांना विंडोज १० होम अशी आवृत्ती उपलब्ध होईल. तसेच ज्यांच्याकडे विंडोजची ७ आणि ८.१ ची व्यवसायिक वापरासाठीची आवृत्ती आहे त्यांना ‘विंडोज प्रो १०’ आवृत्ती उपलब्ध होईल….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )

तुमचा कंम्युटर ‘ विंडोज १०’ला सामावून घेण्यासाठी पात्र आहे की नाही हे पडताळून पाहा. यासाठी ‘get windows 10’ अॅपचा वापर करु शकता. अॅप अोपन केल्यावर वरच्या बाजूस डाव्या कोप-यामध्ये ‘check your PC is good to go’ असा पर्याय दिसून येईल….(सौजन्य- मायक्रोसॉफ्ट )
बाप्पा १२ पैकी ‘या’ राशींसाठी खोलणार प्रगतीचे नवे दार! तुमचा कसा जाणार दिवस? वाचा राशिभविष्य