-
जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पहिले विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. स्टॅनिसलॉस वॉवरिन्का या स्विस खेळाडूने त्याच्यावर ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा विजय मिळवत प्रथमच ही स्पर्धा जिंकली. (पीटीआय)
-
तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमच्या वेळी पुन्हा वॉवरिन्कने सव्र्हिसब्रेक मिळवला व ४-२ अशी आघाडी घेतली. तेथून त्याने खेळावर नियंत्रण राखून हा सेट ६-३ असा जिंकला.
-
नोव्हाक जोकोव्हिचचा गेल्या चार वर्षांतील फ्रेंच ओपन स्पध्रेच्या अंतिम फेरीतील हा तिसरा पराभव आहे. तर, टॅनिसलॉस वॉवरिन्काने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने रविवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावून कारकिर्दीतले दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
-
स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने रविवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावून कारकिर्दीतले दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे
-
ग्रँड स्लॅम स्पर्धेत त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे.
-
-
अतिशय उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत वॉवरिन्काने पहिला सेट गमावल्यानंतर सव्र्हिस व परतीचे फटके यावर सुरेख नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली.
-
जोकोव्हिचने कारकिर्दीत आतापर्यंत आठ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत, मात्र फ्रेंच स्पर्धेत याआधी दोन वेळा अंतिम फेरीत स्थान मिळूनही अजिंक्यपदापासून तो वंचित राहिला होता.
-
दुसऱ्या सेटमध्ये वॉवरिन्काला सूर गवसला. त्याने बॅकहँड व्हॉलिज तसेच कॉर्नरजवळ कल्पकतेने फटके मारत जोकोव्हिचला नामोहरम केले.
-
सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचच्या फ्रेंच ओपनमधील प्रत्येक सामन्यावेळी त्याचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी उपस्थित राहणारी ही चाहती चर्चेचा विषय ठरली आहे. अखरेच्या सामन्यात तिच्यासोबत ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डो देखील उपस्थित होता.(पीटीआय)
-
बेथानी मॅटेक सँड्स आणि ल्युसी साफारोव्हा जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. (पीटीआय)
-
फ्रेंच ओपनमध्ये महिला दुहेरीचेजेतेपद पटकावल्यानंतर आनंद साजरा करताना ल्युसी साफारोव्हा. (पीटीआय)
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”