-
डिन्से हॉलीवूड स्टुडिओच्या साय-फाय डाईन-इन थिएटरमधील अंतर्गत सजावट प्रेक्षकांच्या आकर्षकाचा केंद्रबिंदू आहे. थिएटरमध्येच रेस्टॉरन्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
-
मुंबईत १९५८ साली उभारण्यात आलेल्या मराठा मंदिर चित्रपटागृहाचीही जगातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चित्रपटगृहांमध्ये केली जाते. तब्बल १००० आठवड्यांहून अधिक काळ शाहरुख आणि काजोलचा डीडीएलजे चित्रपट चालवत आल्याबद्दल मराठा मंदिर चित्रपटगृह प्रसिद्ध आहे.
-
इलेक्ट्रीक सिनेमा हे चित्रपटगृह सध्या सिटीस्क्रिन या चित्रपटगृह कंपनीतर्फे चालवले जात आहे. आग लागल्यामुळे हे चित्रपटगृह काही काळासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर रॉयल सोयीसुविधा आणि अद्ययावत तंत्रप्रणालीसह हे चित्रपटगृह २०१२ साली पुन्हा सुरू करण्यात आले.
-
लंडनमध्ये प्रसिद्ध असलेल्या चित्रपटगृहांपैकी एक असलेले हॉट-टब सिनेमा हे चित्रपटगृह चक्क टबमध्ये बसून चित्रपटपाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
ऐतिहासिक चित्रपटगृहांपैकी एक असलेले डेट्रॉईट येथील फॉक्स थिएटर.
-
इंडोनेशियातील ब्लिट्झ मेगाप्लेक्स या चित्रपटगृहात हॉलीवूड, फिल्म फेस्टीव्हिल, आर्ट हाऊस, भारतीय चित्रपट, अॅनिमेशन असे विविध प्रकारातील चित्रपट दाखविले जातात. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी केलेली आरामदायी आणि आलिशान आसनव्यवस्थेमुळे हे चित्रपटगृ प्रसिद्ध आहे.
-
सायंका ऑफ मॅटाडेरो माद्रिद हे चित्रपटगृह पूर्णकाळ नॉन-फिक्शन चित्रपटांसाठी राखीव करण्यात आले आहे. उत्तम बैठकव्यवस्था आणि रोषणाईने हे चित्रपटगृह उठून दिसते.
-
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील रूफटॉप सिनेमा या चित्रपटगृहाच्या नावातच त्याचे वैशिष्ट्य दडले आहे. निरभ्र आकाशाखाली निवांतपणे चित्रपट पाहण्याचा आनंद या रुफटॉप सिनेमामध्ये घेता येतो.
-
जगातील सर्वात आकर्षक चित्रपटगृहांपैकी एक असलेल्या बिजिंगमधील द ऑरेंज सिनेमा क्लब या चित्रपटगृहातील आसन व्यवस्थेत २१ आरामदायी खुर्च्या, ३१ जणांचे आलिशान सोफे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटपाहताना प्रेक्षकांना इतरांचा व्यत्यय येणार नाही याची काळजी घेऊन चित्रपटगृहाचे डिझाईन तयार करण्यात आले आणि त्यानुसार आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
-
ऐतिहासिक वारसा लाभलेले सॅन फ्रान्सिस्को येथली ब्रावा थिएटर.
-
चित्रपटगृह म्हणजे छप्पर असलेली बंद काळोखी खोली या संकल्पनेला भेद देऊन कॅलिफोर्नियात मोकळ्या जागी सुरू करण्यात आलेले हे सिनेस्पिआ थिएटर. चित्रपटगृहाप्रमाणेच येथे मोठी स्क्रिन उभारण्यात आली आहे मात्र, येथे चित्रपट एखादा स्टेज शो सुरू असावा या पद्धतीने मोकळ्या जागी पाहिला जातो. केवळ चित्रपट सुरू होण्यासाठी सुर्यास्ताची वाट पाहिली जाते. प्रेक्षक दाटीवाटीने जमतात मात्र चित्रपटगृहा प्रमाणेच त्यांना आधी आपली आसन व्यवस्था निश्चित करावी लागते.
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी