-
महात्मा फुले यांचे नाव घेत सामाजिक समतेचा लढा देणारे ‘समाजसेवक’, राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्धच्या चौकशीची चक्रे मंगळवारी अधिक वेगाने फिरू लागली. भुजबळ आणि कुटुंबियांच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, लोणावळा येथील विविध मालमत्तांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती सुरू केली आणि एकेकाळी फूल बाजारात फुले विकणाऱ्या भुजबळ यांच्या कुटुंबाची राजकारणात शिरल्यानंतरची आश्चर्यचकित करणारी भरभराट महाराष्ट्रासमोर अधिकृतपणे उघड झाली.
-
इंग्लंड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रॉयल अॅस्कॉर्ट हॉर्स रेसिंग’साठी आकर्षक वेशभुषा करून आलेल्या या महिला. (छाया- पीटीआय)
-
मुंबईतील शिवाजी पार्क येथे सध्या रंगीबेरंगी छत्र्यांच्या सहाय्याने आकर्षक सजावट केलेली पाहायला मिळत आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
‘गर्ल रायझिंग’ या अभियानाच्या सदस्यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. (छाया-पीटीआय)
-
नेस्ले कंपनीच्या मॅगी या पाकीटबंद नूडल्समध्ये अजिनोमोटो आणि शिसे याचे प्रमाण अतिरिक्त आढळल्याने प्रशासनाने त्यावर बंदी घातली. मात्र सस्त्या-रस्त्यावर मिळणा-या चायनिज भेळच्या गाड्या आणि चायनिज पदार्थांचे स्टॉल येथील पदार्थांचे काय? हे पदार्थही शरीरासाठी धोकादायक आहेत, मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. या गाड्यांवर माशा घोंगावत असतानाही अनेक लोक हे पदार्थ खाण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र दिसत आहे. (छाया – गणेश जाधव)
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”