-
सुगीच्या हंगामानंतर शेतकऱ्यांच्या आनंदाला थारा नसतो. शेतात पिकलेलं धनधान्य घरात येतं. त्याचबरोबर समृद्धीही. शेतातील धान्य घरी आणल्यानंतर निसर्गाविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेनं हा सण साजरा केला जातो. याच काळात भारताच्या विविध भागात भौगोलिक विविधतेनुसार वेगवेगळे सण साजरे केले जातात. यापैकी एक म्हणजे पोंगल. पोंगल तामिळनाडूमध्ये प्रामुख्यानं साजरा केला जातो. पण, मुंबईतील धारावीतही असाच पोंगलचा उत्साह बघायला मिळाला… (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)
-
सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली. पहाटेचा अंगाला झोंबणारा गार वारा. अशा वातावरणात धारावीतील ९० फूट रस्ता गर्दीनं फुलून गेला होता.
-
परिसरात राहणाऱ्या तामिळी नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करून पोंगल साजरा केला. यावेळी बच्चे कंपनीसह सगळ्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.
-
पोंगल हा कृषि संस्कृतीशी निगडित असलेला एक सण आहे. महाराष्ट्रात हा सण मकरसंक्रात असं म्हटलं जातं.
-
साधारणतः जानेवारी महिन्यात हा सण चार दिवस साजरा केला जातो. नवीन धान्य आल्यानंतर घरातील सामनाची तसेच पशुधनाची स्वच्छता केली जाते. त्यानंतर तांदळाची भोगी (नैवेद्य) तयार करून सूर्याला दाखवला जातो.
-
पहिल्या दिवशी भोगी पोंगल साजरा केला जातो. त्यानंतर थाई पोंगल, मट्टू पोंगल आणि कान्नुम पोंगल असा हा सण चार दिवस चालतो. या काळात अनेक ठिकाणी जत्राही भरतात.
-
पोंगलची सुरुवात संगम युगापासून झाला असून, या सणाला २ हजार वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जाते.
-
महाराष्ट्रात पोळ्याला बैलांची पूजा केली जाते. तामिळनाडूत पोंगलला बैलाची पूजा केली जाते. बैलांना धुतले जाते. त्यांना सजवून त्यांची पूजा करण्यात येते.
-
पहाटे धारावीतील रस्त्यावर सगळीकडे चुलीची पद्धशीर मांडणी करण्यात आली होती. तर महिला नैवेद्य बनविण्याच्या तयारीत मग्न झाल्या होत्या.
-
पोंगल साजरा करतानाचा धारावीतील हा भारावून टाकणारा फोटो.
-
पोंगलच्या दिवशी पारंपरिक लोकगीते गायली जातात. त्याचबरोबर नृत्येही केली जातात. अत्यंत भक्तिभावाने हा सण साजरा होतो.
-
यादिवशी सूर्य देवाला नैवेद्य अर्पण केला जातो, म्हणून पोंगल म्हटलं जातं. पोंगलचा दुसरा अर्थ व्यवस्थित शिजवून घेणे असाही होतो.
-
तामिळी नववर्षाची सुरूवात पोंगल सणापासून होते म्हणून या सणाला तामिळनाडूत महत्त्व आहे.
-
तामिळ बांधवांच्या या आनंदायाच्या प्रसंगी मुस्लीम समुदायातील महिलांनी सहभागी होत, जणू विविधतेत एकात्मतेचा संदेश दिला.
-
पोंगलनंतर दिवसानंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिवस तीळ-तीळ वाढत जातो अशी कथा सांगितली जाते.
-
भोगी पोंगलच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते.
-
महादेवाचं वाहन असलेल्या नंदी अर्थात बैलाची पोंगलच्या तिसऱ्या दिवशी पूजा केली जाते. यातून बैलाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते.
-
पोंगलच्या अखेरच्या दिवशी घरे सजवण्यात येतं. दिवाळीसारखाचं उत्साहात चौथ्या दिवशी पोंगल साजरा केला जातो.

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य