-
घातक अशा कोरेना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने दहा दिवसात नवे रुग्णालय उभे केले आहे.
-
आजाराचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरातच हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.
-
केवळ १० दिवसात हे रुग्णालय उभारण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले.
-
फक्त कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांसाठी या रुग्णालयाचा वापर करण्याचा चीनचा उद्देश आहे.
-
कोरोना विषाणूचा प्रसाररोखण्यासाठी चीनमधील काही शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
-
चीनमधल्या सरकारी वाहिनीवर रुग्णालय बांधणीसाठी सुरु असलेल्या कामाचा व्हिडीओ दाखवण्यात आला.
-
शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, २५ हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे केले आहे.
-
१ हजार खाटांची व्यवस्था या रुग्णालयात करण्यात आली आहे.
-
चीनमध्ये आतापर्यंत खूप लोकांना कोरेना विषाणूची लागण झाली आहे.
-
कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक