-
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातील रस्त्यांवर रविवारी हटके आणि भन्नाट कार आणि दुचाकी बघायला मिळाल्या. (सर्व फोटो : आशिष काळे)
-
पुण्यातील रॅडीसन ब्लु हॉटेलमध्ये या जुन्या कारचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
-
पश्चिम ऑटोमोबाईल असोसिएशनच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या जुन्या आणि देखण्या कार रस्त्यावरून धावल्या.
-
मर्सिडीज, रॉल्स रॉयल, बेंटली, शेव्हर्लेट यासारख्या प्रतिष्ठेच्या कारसह अनेक कार यावेळी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.
-
वेगवेगळ्या आकारातील आणि आकर्षक रंगात असलेल्या कार बघण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.
-
या कारसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.
-
विशेष म्हणजे १८८६ पासूनच्या कार या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या.
-
सध्याच्या कारपेक्षा वेगळ्या धाटणीच्या कार सगळ्यानांच मोहात पाडत आहे.
-
छोट्या छोट्या कार पुण्यातील रस्त्यावर फिरत असताना काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”