-
रोज आपण अनेक कंपन्यांची नावं अगदी सहज घेतो. म्हणजे उदाहर्णार्थ सांगायचं झालं तर HP, HDFC, BMW वगैरे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र आपल्या पैकी किती जणांना या कंपन्यांच्या नावांचा फूलफॉर्म ठाऊक असतो. अर्थात या प्रश्नाचे उत्तर नाही असचं द्यावं लागेल. आपल्यापैकी अनेकांना या लोकप्रिय कंपन्याचे पूर्ण नाव काय आहे हे ठाऊक नसतं. अशाच काही कंपन्यांबद्दल आपण या फोटोगॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत.
-
ESPN – ही क्रिडा वाहिनी ठाऊक नसणारा क्रिडाप्रेमी सापडणं मुश्कीलच. ESPN चा फूलफॉर्म Entertainment And Sports Programming Network असा आहे.
-
BPL – एक काळ गाजवणारा टीव्हीचा ब्रॅण्ड म्हणजे BPL. या कंपनीचे पूर्ण नाव आहे British Physical Laboratories.
-
BMW – जागतिक स्तरावर वाहनश्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या BMW चा फूलफॉर्म आहे Bayerische Motoren Werke (बायरीचे मोटोरेन वॅर्के)
-
AND – या प्रसिद्ध कपड्याच्या ब्रॅण्डचा फूलफॉर्म म्हणजे या ब्रॅण्डच्या मालकिणीचं नाव आहे. अनिता डोंगरे यांच्या नावावरुन AND असं नाव या ब्रॅण्डला देण्यात आलं आहे.
-
DKNY – जगप्रसिद्ध कपड्याच्या ब्रॅण्डचे नाव हे ब्रॅण्डची मालकीण आणि या ब्रॅण्डचा जन्म ज्या शहरात झाला आहे त्यावरुन ठेवण्यात आला आहे. DK म्हणजे ब्रॅण्डच्या संस्थापक Donna Karan आणि NY म्हणजे जिथे या ब्रॅण्डचा जन्म झाला ते New York शहर.
-
H&M – या प्रसिद्ध कपड्यांच्या कंपनीचे पूर्ण नाव आहे Hennes & Mauritz.
-
HP – प्रसिद्ध लॅपटॉप कंपनी असणाऱ्या HP च्या नावाचा फूलफॉर्म आहे Hewlett Packard (हिवेल्ट पॅकार्ड)
-
IBM – १९११ साली स्थापन झालेल्या या कंपनीला IBM हे नाव १९२४ साली देण्यात आले. International Business Machines असा IBM चा फूलफॉर्म आहे.
-
FIAT – वाहन उद्योग श्रेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणारी या कंपनीचे फूलफॉर्म आहे Fabbrica Italiana Automobili Torino. याचा अर्थ होतो ट्यूरीन शहरातील गाड्या बनवणारी कंपनी.
-
ICICI Bank – प्रत्येक भारतीयाला ठाऊक असणारी खासगी श्रेत्रातील ही बँक आहे. Industrial Credit and Investment Corporation of India असा या बँकेच्या नावाचा फूलफॉर्म होतो.
-
LG – इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीमधील आघाडीची कंपनी असणाऱ्या LG च्या नावाचा फूलफॉर्म होतो Lucky Chemical. आधी या कंपनीचे नाव गोल्डस्टार असं होतं. १९९५ साली Lucky Chemical आणि LG Cable या कंपन्या विलीन झाल्या.
-
ITC – खाद्य उद्योगात असणाऱ्या ITC कंपनीचे आधीचे नाव Imperial Tobacco Company असं होतं. १९७० च्या सुमारात ते बदलून Indian Tobacco Company असं करण्यात आलं. तरी कंपनीच्या नावाचा शॉर्टकट सारखाच म्हणजेच ITC असाच राहिला.
-
Intel – माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील नावाजलेली कंपनी. या कंपनीचे नाव दोन शब्दांमधील अक्षरे एकत्र करुन तयार करण्यात आलं आहे. Integrated Electronics या शब्दांमधून Intel या नावाचा जन्म झाला आहे.
-
JBL – इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनवणारी त्यातही खास करुन स्पीकर्स बनवणाऱ्या या कंपनीची स्थापना १९४६ साली झाली आहे. James Bullough Lansing असा या कंपनीच्या नावाचा फूलफॉर्म होतो.
-
Amul – गुजरातमधील जगप्रसिद्ध अमुल कंपनीच्या नावाचा एक फूलफॉर्म आहे हे तुम्हाला सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र कंपनीच्या नावाचा म्हणजेच Amul चा फूलफॉर्म Anand Milk Union Limited असा आहे.
-
LEGO – या कंपनीचे नाव डॅनिश भाषेतील शब्दावरुन ठेवण्यात आलं आहे. Leg Godt वरुन LEGO हे नाव पडले असून या शब्दांचा डॅनिश भाषेत अर्थ होतो 'नीट खेळा'.
-
Adidas – बूट बनवणाऱ्या कंपनीचे नाव कंपनीच्या संस्थापकाच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. Adolf Dassler (अॅ़डॉल्प डॅसलर) यांच्या नावावरुन Adidas हे नाव ठेवण्यात आलं.
-
MRF – गाडी चालवत नसले तरी प्रत्येक क्रिकेट चाहत्याला ठाऊक असणारी कंपनी म्हणजे MRF. या MRF चा फूलफॉर्म Madras Rubber Company असा होतो.
-
BSA – या प्रसिद्ध सायकल निर्माता कंपनीचे संपूर्ण नाव Birmingham Small Arms असं आहे.
-
DLF – बांधकाम श्रेत्रातील या कंपनीचे संपूर्ण नाव आहे Delhi Land & Finance.
-
HTC – या जगप्रसिद्ध मोबाईल कंपनीच्या नावाचा फूलफॉर्म High Tech Computer.
-
HDFC Bank – १९९४ मध्ये स्थापन झालेली ही बँक सध्याच्या घडीला देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. HDFC या बँकेच्या नावातील अक्षरांचा फूलफॉर्म Housing Development Finance Corporation असा आहे.

Apple Event 2025 Live Updates: दमदार फिचर्ससह आयफोन 17 एयर लाँच, आजवरचा सर्वात स्लिम आयफोन