-
‘तेजस’ हे स्वदेशी बनावटीचे हलके फायटर विमान आहे. फ्लाइंग ड्रॅगनच्या नावाने ओळखले जाणारे तेजसचे पहिले स्क्वाड्रन एअर फोर्सच्या तामिळनाडूतील सुलूर येथील बेसवर तैनात आहे.
-
मिग-२९ हे चौथ्या पिढीचे रशियन बनावटीचे फायटर विमान आहे. या विमानांची उपयुक्ततता लक्षात घेऊन भारत लवकरच रशियाकडून आणखी मिग-२९ विमाने विकत घेणार आहे. (Express photo: Sarabjit Singh)
-
सुखोई हे भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. हवाई युद्धामध्ये भारताची मुख्य भिस्त याच विमानावर आहे. आता सुखोईवरुन ब्राह्मोससारखे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रही डागता येऊ शकते. हे रशियन बनावटीचे विमान आहे.
-
इंडियन एअर फोर्सने मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी स्पाइस २००० बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बच्या सहाय्याने टार्गेटवर अत्यंत अचूकतेने हल्ला करता येतो.
-
भारताने मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी याच मिराज-२००० विमानांचा वापर केला होता. ही फ्रेंच बनावटीची फायटर विमाने आहेत. (फोटो सौजन्य – Indian Air Force)
-
अपाचे हे अमेरिकन बनावटीचे लढाऊ हेलिकॉप्टर आहे. जगातील वेगवेगळया देशात युद्धामध्ये अपाचेने आपली उपयुक्ततता सिद्ध केली आहे. अपाचेवर ३० मिमी व्यासाची चेन-गन आहे. ती मिनिटाला ६२५ गोळ्या झाडू शकते. त्यासह हायड्रा-७० रॉकेट, स्टिंगर, हेलफायर आणि साइडवाइंडर ही क्षेपणास्त्रे बसवता येतात. सध्या अपाचे हेलिकॉप्टर लडाखमध्ये तैनात आहे.
-
बोइंग सीएच-४७ चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ते सहज ओळखता येते. चिनुकमुळे हॉवित्झर तोफाही सहजनेते डोगराळ भागात पोहोचवता येतील. हे हेलिकॉप्टर सुद्धा लडाखमध्ये तैनात आहे.
-
पी-८आय हे अमेरिकेच्या बोईंग कंपनीने विकसित केलेले विमान आहे. सागर तळाशी असलेली पाणबुडी शोधून काढण्याबरोबर टेहळणीसाठी सुद्धा पी-आठ आय उपयुक्त विमान आहे. सध्या लडाखमध्ये या विमानांचा वापर सुरु आहे.
-
पूर्व लडाखमधील दौलत बेग ओल्डी (डीबीओ) हवाईपट्टी सध्या चीनशी सुरू असलेल्या वादामध्ये भारताकडून वापरली जात आहे. १६ हजार ८०० फूटांपेक्षा जास्त उंचीवरील सर्वात आधुनिक लँडिंग सेवा असणाऱ्या पठारी भागांमध्ये डीबीओ हवाईपट्टीचा समावेश होतो. या ठिकाणी एएन -३२ आणि सी-१३० सारखे सुपर हरक्यूलिस विमाने सहज लँडिंग करु शकतात. ही चीनसाठी धोक्याची घंटा आहे.
-
राफेल हे भारताचे सर्वात अत्याधुनिक फायटर विमान आहे. मागच्या महिन्यात ही विमाने भारतीय वायू दलाचा भाग झाली. ४.५ जनरेशनच्या या विमानामुळे भारताची अचूक आणि खोलवर हल्ला करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे. सध्याच्या घडीला चीन-पाकिस्तान दोन्ही देशांकडे राफेलच्या तोडीचे विमान नाहीय.

IND vs ENG: ऋषभ पंतला मैदानात दुखापत, डाव्या पायातून आलं रक्त; रिटायर्ड हर्ट होत गेला बाहेर; नेमकं काय घडलं?