आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी अनेक मुलाखतींमध्ये खासगी आयुष्याविषयी खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी त्यांची मुलगी इशासोबत घडलेला एका किस्सा सांगितला. नीता अंबानी यांना स्वत:ला नृत्याची फार आवड आहे. मुलीनेही नृत्याची आवड जोपासावी यासाठी त्यांनी इशाला डान्स क्लासला पाठवलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "इशा पाच-सहा वर्षांची असताना एके दिवशी डान्स क्लासला जाण्यासाठी घरातून निघाली. मात्र ती रस्ता चुकली. तिच्यासोबत नेहमी कोणी ना कोणी असायचे पण त्यादिवशी तिला रस्ता लक्षात राहावा यासाठी एकटं पाठवलं होतं." "रस्ताच्या बाजूला उभी राहून इशा ढसाढसा रडत होती. या घटनेचा तिच्या मनावर परिणाम झाला आणि तेव्हापासून तिने डान्स क्लासला जाणं आणि डान्स करणं सोडून दिलं", असं त्यांनी पुढे सांगितलं. इशाने पिरामल इंडस्ट्रीजच्या आनंद पिरामल यांच्याशी लग्न केलं. इशाने पिरामल इंडस्ट्रीजच्या आनंद पिरामल यांच्याशी लग्न केलं.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”