-
भारतातील चलनी नोटा आणि त्यांच्यावर असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावरुन राजकीय वातावरण बरंच तापलं आहे.
-
खरंतर गेल्या दोन पिढ्यांपासून आपण नोटांवर महात्मा गाधींचाच फोटो पाहात आहोत. गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून हाच फोटो भारतीय चलनी नोटांवर आहे.
-
वैविध्यानं नटलेल्या भारत देशात विविध संस्कृती, परंपरा आणि धर्म मानले जातात. याचा प्रभाव भारतीय चलनावरदेखील दिसून आला आहे. ओडिशाच्या कोनार्कमधील सूर्य मंदिराचे छायाचित्र दहा रुपयाच्या नोटेवर छापण्यात आले आहे. रथाच्या आकारात बनलेल्या या मंदिराला २४ चाकं आणि सात घोडे आहेत. २४ चाकं दिवसाचे २४ तास तर सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात.
-
२० रुपयाच्या नोटेवर महाराष्ट्रातील वेरुळच्या लेण्या रेखाटण्यात आल्या आहेत. वेरुळमध्ये ३४ लेण्या आहेत. या लेण्या इसवीसन पूर्व ६०० ते १ हजार वर्षांच्या कालावधीत बांधण्यात आल्या आहेत. या लेण्यांना ‘यूनेस्को’ने (UNESCO) जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.
-
कर्नाटकातील प्राचीन हम्पी शहरातील कलाकृतींचे छायाचित्र आपल्याला ५० च्या नोटेवर पाहायला मिळते. या शहरात २५० प्राचीन मंदिरं आणि घरं आहेत. या शहरात जवळपास ५०० प्राचीन स्मारकं असून ‘यूनेस्को’ने (UNESCO) जागतिक वारसास्थळ म्हणून या ठिकाणाला घोषित केले आहे.
-
गुजरातच्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘रानी की वाव’ या वारसास्थळाचे छायाचित्र १०० च्या नोटेवर रेखाटण्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या ८०० आकर्षक मूर्त्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. या वारसास्थळाचे ‘यूनेस्को’कडून जतन करण्यात आले आहे.
-
मध्य प्रदेशात सांची स्तूप हे बौद्ध वारसास्थळ प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकाने कलिंगमध्ये युद्ध लढले होते. या युद्धातील रक्तपाताने उद्विग्न होऊन या राजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांच्या आदेशानंतर हे स्तूप बांधण्यात आले होते. या वास्तूचे छायाचित्र आपल्याला २०० च्या नोटेवर पाहायला मिळते.
-
देशाच्या राजधानीतील लाल किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुघल साम्राज्यातील पाचवे सम्राट शाहजहाँ यांनी हा किल्ला बांधला होता. याच किल्ल्यावर दरवर्षी १५ ऑगस्टला भारताचा राष्ट्रध्वज फडकावला जातो. या किल्ल्याचे छायाचित्र ५०० च्या नोटेवर छापण्यात आले आहे.
-
भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब असलेले ‘मंगलयान’चे छायाचित्र २००० च्या नोटेवर छापण्यात आले आहे. पहिल्या प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”