-
भारत हा असा देश आहे जिथे प्रत्येक कोपऱ्यात काही रहस्ये आणि गूढ कथा दडलेल्या आहेत. लहानपणी आपण आपल्या आजींकडून भूतकथा ऐकल्या आहेत, ज्यामध्ये गावांमध्ये, किल्ल्यात किंवा निर्जन रस्त्यांवर भूत दिसल्याबद्दल रंगवून सांगितले जात असे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात अशी काही रेल्वे स्टेशन आहेत जी अशाच भीतीदायक आणि विचित्र घटनांसाठी कुप्रसिद्ध आहेत. यांच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा सांगितल्या जातात. चला जाणून घेऊया देशातील अशा 10 रेल्वे स्टेशन्सबद्दल. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo)
-
बडोग रेल्वे स्टेशन, हिमाचल प्रदेश
शांत टेकड्यांच्या मध्ये वसलेले हे स्टेशन कर्नल बडोग या ब्रिटिश अभियंत्याच्या कथेसाठी प्रसिद्ध आहे. कर्नल बडोग यांनी या स्टेशनजवळ एक बोगदा बांधला होता, परंतु एका कारणांमुेळे तो बोगदा पूर्ण होऊ शकला नाही. कर्नल बडोग यांनी आत्महत्या केली आणि आता त्यांचा आत्मा या बोगद्याजवळ भटकत असल्याचा लोकांचा समज आहे अनेक पर्यटकांनी कर्नल बरोग यांना बोगद्याजवळून चालताना पाहिल्याचा दावा केला जातो. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo) -
बेगुनकोडोर रेलवे स्टेशन पश्चिम बंगाल
बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या जंगलात आहे. येथे पांढऱ्या साडी परिधान केलेल्या एका महिलेचे भूत असल्याची अफवा पसरली आहे. असे म्हटले जाते की या महिलेने आत्महत्या केली आणि आता तिचा आत्मा स्टेशनजवळ भटकत राहतो असा लोकांचा गैरसमज आहे. यामुळेच हे स्टेशन ४२ वर्षे बंद राहिले. २००९ मध्ये ते पुन्हा उघडण्यात आले. (छायाचित्र स्रोत: द हॉन्टेड प्लेसेस/फेसबुक) -
चित्तूर रेल्वे स्टेशन, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चित्तूर रेल्वे स्टेशन संबंघित एका महिलेच्या भूताची कथा सांगितली जाते. अनेक प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा तिला रडताना ऐकल्याचे सांगितले आहे. दुसऱ्या एका कथेनुसार, एकदा हरि सिंह नावाच्या सीआरपीएफ जवानाला आरपीएफ जवानांनी आणि एका टीटीईने इतका मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्या अधिकाऱ्याचा आत्मा येथे भटकत आहे असे लोक मानतात. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo) -
धनबाद रेल्वे स्टेशन, झारखंड
धनबाद रेल्वे स्थानकाभोवती देखील एका महिलेच्या आत्म्याची जोडून सांगितली जाते. असे म्हटले जाते की एका दुःखद घटनेमुळे त्या महिलेचा मृत्यू झाला आणि आता तिचा आत्मा प्लॅटफॉर्मवर भटकतो. बरेच लोक म्हणतात की त्यांनी रात्री तिथे एका महिलेची सावली पाहिली आहे आणि तिचे आवाज ऐकला आहेत. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo) -
डोंबिवली रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र
डोंबिवली रेल्वे स्थानक अनेक अपघात आणि गूढ घटनांमुळे झपाटलेले मानले जाते. या स्टेशनबद्दलही अनेक अफवा आहेत, जसे की प्रवाशांचे म्हणणे आहे की त्यांना येथे विचित्र ओरडण्याचा आवाज येतो आणि कधीकधी विनाकारण ट्रेनचे ब्रेक लावले जातात, असे सांगितले जाते. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo) -
द्वारका सेक्टर ९ मेट्रो स्टेशन, दिल्ली
द्वारका मेट्रो स्टेशनभोवती एक भुताटकीची महिला दिसत असल्याच्या अफवा आहेत. असे म्हटले जाते की ही महिला प्रवाशांच्या गाड्यांचा पाठलाग करते आणि त्यांना स्वतःकडे आकर्षित करते. अनेक प्रवाशांनी तिला रस्त्यावर चालताना पाहिल्याचा दावाही केला आहे आणि तिच्याबद्दल अनेक भयानक कथा सांगितल्या जातात. (छायाचित्र स्रोत: @vish__746/इंस्टाग्राम) -
कानपूर मध्य रेल्वे स्टेशन, उत्तर प्रदेश
कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पांढऱ्या साडी परिधान केलेल्या एका महिलेला भूत दिसल्याच्या अफवा आहेत. असे मानले जाते की या महिलेचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला होता. प्लॅटफॉर्मवरील अनेक प्रवाशांनी या महिलेची सावली पाहिल्याचा दावा केला आहे .(छायाचित्र स्रोत: indiarailinfo) -
लुधियाना रेल्वे स्टेशन, पंजाब
लुधियाना रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयाबैबतहा अशीच अफवा आहे. कर्तव्यावर असताना एकाकर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि आता त्याचा आत्मा कार्यालयात फिरत राहतो , असं सांगितलं जातं. अनेक कर्मचारी आणि प्रवाशांचे म्हणणे आहे की लोकांना रात्री कार्यालयात राहण्यास भीती वाटते. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo) -
नागपूर रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र
नागपूर रेल्वे स्टेशनची इमारत खूप जुनी आहे आणि ती ब्रिटिश काळात बांधली गेली होती. जुन्या रचनेमुळे येथे एक विचित्र आणि भीतीदायक वातावरण आहे. रात्रीच्या वेळी येथे विचित्र हालचाली होतात आणि एक भीतीदायक शांतता जाणवते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo) -
नैनी रेल्वे स्टेशन, उत्तर प्रदेश
नैनी रेल्वे स्टेशनचे नाव ब्रिटिश काळाशी जोडले गेले आहे. हे स्टेशन नैनी तुरुंगाजवळ आहे, जिथे स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. असे म्हटले जाते की त्या वीरांचे आत्मे अजूनही या स्टेशनवर फिरतात. अनेक प्रवाशांनी येथे विचित्र घटना आणि भयानक आवाज अनुभवल्याचे दावे केले आहेत. (छायाचित्र स्रोत: indiarailinfo)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्