-
जर तुम्ही एखादी बँक किंवा फायनाशियल कंपनीकडून लोन घेतले असेल आणि कुठल्यातरी कारणामुळ ते वेळेवर फेडू शकला नसाल तर तुम्हाला वसुली एजंट संपर्क करू शकतात.(फोटो – pexels)
-
आरबीआय आणि आयपीसीच्या नियम तुम्हाला अशा वसुली एजंटकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, वाईट वागणूक किंवा बेकायदेशीर कारवाईविरोधात संरक्षण देतात. जर एखादा एजंट तुम्हाला धमकी देत असले, शिवीगाळ किंवा सतत फोन करत असेल, तसेच परवानगीशिवाय किंवा पूर्वसीटना न देता घरी येत असेल तर हे सर्वकाही कायदेशीररित्या चुकीचे आहे. (फोटो – pexels)
-
आरबीआयच्या नियमांनुसार, सकाळी ८च्या आधी किंवा संध्याकाळी ७ च्या नंतर वसुली एजंट कर्ज घेणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करू शकत नाही. त्यांनी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी देखील कॉल करता येत नाही. (फोटो – pexels)
-
कर्ज वसुली एजंट तुमच्याशी बोलणे सुरू करण्याच्या आधी आयडी कार्ड दाखवणे आवश्यक आहे, आयडी कार्ड नसताना तुमच्याशी बोलणे हे बेकायदेशीर ठरते. (फोटो – pexels)
-
तुमच्या कर्जाची माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसमोर उघड करणे किंवा शेअर करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. यासाठी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. (फोटो – pexels)
-
जर एखादा एजंट तुम्हाला धमकी देत असेल किंवा इतर काही नुकसान करत असेल तर आयपीसीच्या कलम ३१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (फोटो – pexels)
-
वारंवार धमकाने किंवा भीती घालणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम ३३१(१) अंतर्गत गुन्हा मानला जातो हे लक्षात असू द्या . (फोटो – pexels)
-
पुरावे गोळा करा
फोन रेकॉर्डिंग, व्हिडीओ, तरीख आणि वेळ लिहून ठेवा. हे पुरावे तक्रार दाखल करताना मदतीचे ठरू शकतात. यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. कोर्टात खटला दाखल करा. बँकेच्या तक्रार सेलकडे किंवा आरबीआयच्या Ombudsman शी संपर्क साधा. (फोटो – pexels)

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”