-
जगातील वेगवेगळ्या देशांच्या चलनाच्या किमतीमध्ये मोठा फरक आढळून येतो. काही देशांचे चलन इतके कमकुवत अते की तेथे भारतीय रुपयाची किंमत कोटींमध्ये असते. आर्थिक कारण, राजकीय अस्थिरता आणि महागाई अशा काही कारणांमुळे काही देशांच्या चलनाची किंमत सतत खाली जात असते. (फोटो- pexels)
-
काही देशांचे चलन सर्वात कमी मुल्य असलेल्या देशांच्या यादीत कायमचेच पाहायला मिळते. आज आपण येथे भारतीय रुपयाची किंमत जास्त असलेल्या देशांबद्दल जाणून घेणार आहेत.येथील नागरिकांना त्यांच्या कमकुवत चलनामुळे कशा प्रकारे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत. (फोटो- pexels)
-
इराणचे चलन रियाल
रियाल हे जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक आहे. येथे तुम्हाला १ रुपयाच्या बदल्यात सुमारे ४९० ते ५०० रियाल मिळतात. आर्थिक निर्बंध, राजकीय अशांतता आणि सतत वाढती महागाई यामुळे रियाल कमकुवत झाले आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी इराणी सरकार ‘तामन’ नावाचे एक नवीन चलन आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये १ तामन हे १० रियालच्या बरोबर असेल, यामुळे व्यवहार करणे सोपे होईल आणि महागाई नियंत्रित येईल. (फोटो- pexels) -
व्हिएतनामी डोंग
व्हिएतनामचे चलन डोंग देखील खूप कमकुवत आहे. येथे तुम्हाला १ रुपयाच्या बदल्यात सुमारे ३०० डोंग मिळतात.पण हे परदेशातून व्हिएतनामी उत्पादनांची खरेदी वाढवण्याच्या आणि देशाच्या निर्यातीला बळकटी देण्याच्या सरकारच्या धोरणाचा एक भाग आहे. व्हिएतनामची अर्थव्यवस्था सतत वाढत असली तरी, डोंगचा हा स्तर अजूनही कमकुवत मानला जातो. (फोटो- pexels) -
इंडोनेशियन रुपिया
इंडोनेशियन रुपिया हे चलन देखील नेहमी चर्चेत असते कारण तुम्हाला १ रुपयाच्या बदल्यात सुमारे १८५-१९० रुपिया मिळतात. इंडोनेशियाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत परंतु जागतिक बाजारपेठेतील चढउतार आणि कमोडिटी प्राइसमुळे रुपिया अजूनही कमकुवत आहे. (फोटो- pexels) -
लाओसचे किप हे चलन
लाओसचे चलन किप देखील खूप कमकुवत आहे, येथे १ रुपयांच्या बदल्यात २५०-२६० किप मिळतात. लाओसची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ज्यामुळे विकासाचा वेग कमी आहे आणि चलन कमकुवत आहे. पण पर्यटकांसाठी येथे फिरायला जाणे खिशाला परवडणारे ठरू शकते. (फोटो- Freepik) -
सिएरा लिओन येथील लिओन
सिएरा लिओनचे चलन लिओन हे देखील एक कमकुवत चलन आहे, जे की देशाच्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि कमकुवत आर्थव्यवस्थेमुळे आहे. (परदेशात प्रवास करताना किंवा व्यवसाय करताना विचार करुन चलनाची देवाणघेवाण करणे महत्वाचे आहे. कमकुवत चलने असलेल्या देशांच्या आर्थिक स्थितीवर आणि राजकीय स्थिरतेवर लक्ष ठेवल्याने तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकता. (फोटो- Freepik) -
कमकुवत चलन आणि भारतीय रुपयाच्या मजबुतीचा आर्थिक परिणाम काय?
कमकुवत चलन असलेल्या देशांना महागाई आणि दैनंदिन गरजांसाठी जास्त किंमत मोजावी लागते कारण त्यांच्याकडे परकीय चलनाचा अभाव असतो. दुसरीकडे, भारतीय रुपया त्यांच्यापेक्षा खूपच मजबूत आहे, ज्यामुळे हे देश भारतीय नागरिकांसाठी परवडणारे आणि बजेट-फ्रेंडली ठिकाणे ठरू शकतात. (फोटो- pexels)
-
परदेशात प्रवास करताना किंवा व्यवसाय करताना विचार करुन चलनाची देवाणघेवाण करणे महत्वाचे आहे. कमकुवत चलने असलेल्या देशांच्या आर्थिक स्थितीवर आणि राजकीय स्थिरतेवर लक्ष ठेवल्याने तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकता. (फोटो- pexels)