-
अचानक पैशाची गरज पडल्यास तुम्ही पर्सनल लोन घ्याल की गोल्ड लोन? चला या दोन्हीचे फायदे, तोटे जाणून घेऊया (फोटो- pexels)
-
गोल्ड लोन नेमकं काय असतं?
गोल्ड लोनमध्ये तुम्हाला सोने तारण ठेवून बँक किंवा फायनाशियल इंस्टिट्यूटकडून पैसे मिळतात. साधारणपणे ७० ते ८० टक्के सोन्याच्या मूल्यावर हे दिले जाते. हे कर्ज पूर्णपणे फेडले की तुमचे सोने तुम्हाला परत केल जाते. (फोटो- pexels) -
पर्सनल लोन काय असते?
पर्सनल लोन कोणत्याही तारणाशिवाय किंवा सेक्युरिटी ठेवून न घेता दिले दाते. हे कर्ज मिळविण्याची पात्रता तुमच्या उत्पन्नावर, क्रेडिट स्कोअरवर आणि नोकरीच्या प्रोफाइलवर अवलंबून असते. याची चांगली बाब म्हणजे तुम्हाला यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवावी लागत नाही. (फोटो- pexels) -
गोल्ड लोनचे वैशिष्ट्य काय?
गोल्ड लोन घेण्याचा एक फायदा असा आहे की तुम्ही पैसा कशासाठी वापरता यावर कोणतेही बंधन राहत नाही. बँक किंवा एनबीएफसी हे लवकर अप्रूव्ह करते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी जरी असेल तरी हे कर्ज तुम्हाला अगदी सहज मिळते. (फोटो- pexels) -
गोल्ड लोनचे तोटे काय आहेत?
जर तुम्ही गोल्ड लोन वेळेत फेडले नाही तर बँक तुमचे सोने विकू शकते, तसे अधिकार त्यांना असतात. याबरोबर कर्जाच्या रक्कम सोन्याची किंमतीच्या ८० टक्केच मिळते. म्हणजे ही रक्कम तुम्हाला अपुरी पडू शकते. (फोटो- pexels) -
पर्सनल लोनचे फायदे
पर्सनल लोनसाठी तुम्हाला कसलीही सेक्युरिटी द्यावी लागत नाही. याचा वापर लग्न, मेडिकलचे कर्ज फेडणे अशा कामांमध्ये केला जाऊ शकतो. हा हाय इंटरेस्ट क्रेडिट कार्डच्या तुलनेने स्वस्त पडणारा पर्याय आहे. (फोटो- pexels) -
पर्सनल लोनमध्ये अडचणी काय येऊ शकतात?
पर्सनल लोनसाठी प्रोसेसिंग फीस आणि इतर चार्जेस खूप जास्त असू शकतात. जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. ईएमआय चुकवला तर पुढच्या वेळेस कर्ज मिळणे अडचणीचे ठरते. (फोटो- pexels) -
व्याजदर कसा असेल?
सोन्याच्या कर्जावरील व्याजदरसाधारणपणे वार्षिक ७.७ टक्क्यांपासून सुरू होतात. पर्सनल लोनवरील हा दर ८.५ टक्के ते १३.६ टक्के इथपर्यंत असू शकतो. म्हणजेच, व्याजदराच्या बाबतीत गोल्ड लोन तुलनेने स्वस्त असू शकते. (फोटो- pexels)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”