-
नवज्योत सिंग सिध्दूचे वडील सरदार भगवंत सिंग क्रिकेटपटू होते. मुलानेदेखील खेळात नाव कमवावे अशी त्यांची इच्छा होती. याच करणास्तव वयाच्या २० व्या वर्षी १९८३ मध्ये सध्दूने क्रिकेटपटू म्हणून कारकिर्दीला सुरुवात होती. (Image Source: Indian Express)
-
१९८९ मध्ये शारजाहमधील चॅम्पियन करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात सिध्दूने पहिले शतक झळकवले होते. (Image Source: indian Express)
-
संथगतीने शतक साधण्याचा विक्रमदेखील सिध्दूच्या नावावर आहे. जागतिकपातळीवर या यादीत त्याचा पाचवा क्रमांक लागतो. (Image Source: Indian Express)
-
सिध्दूने पहिले आणि शेवटचे शतक पाकिस्तानविरुध्द खेळताना झळकावले. (Image Source: indian Express)
-
नवज्योतसिंग सिद्धू (संग्रहित छायाचित्र)
-
१९९९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिध्दूने समालोचन करण्यास सुरुवात केली. वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील समालोचनामुळे त्याला चांगलीच प्रसिध्द मिळाली. (Image Source: Indian Express)
-
२००४ साली आलेल्या 'मुझसे शादी करोगी' आणि २००८ मध्ये आलेला पंजाबी चित्रपट 'मेरा पिंड'मध्ये त्याने अभिनयदेखील केला आहे. तसेच छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये पंचाच्या रुपात दिसणारा सिध्दू प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडल्याचे पाहायला मिळते. (Image Source: Indian Express)
-
-
प्रामुख्याने पंजाबी लोकांना चिकन खाण्याचे वेड असल्याचे पाहायला मिळत असले, तरी सिध्दू पूर्णपणे शाकाहारी आहे. (Image Source: Indian Express)

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर