-
कॅप्टन कूल असं बिरुद मिळवलेल्या महेंद्रसिंह धोनीचा आज ३९ वाढदिवस आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळख असलेला धोनी गेल्या वर्षभरापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
-
२०१९ विश्वचषकापासून धोनीची वन-डे क्रिकेटमधली संथ खेळी हा चर्चेचा विषय ठरली होती, या स्पर्धेनंतर निवड समितीने धोनीला संधी दिली नाही.
-
आज आपण धोनीचे वन-डे क्रिकेटमधले ५ अनोखे विक्रम पाहणार आहोत…
-
५) ऑक्टोबर २००५ मध्ये धोनीने श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज नाबाद १८३ धावांची खेळी केली होती. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात धोनीने लंकन गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक हा विक्रम धोनीच्या नावावर अबाधित आहे.
-
४) यष्टींमागे आपल्या चपळ कामगिरीसाठी धोनी ओळखला जातो. भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून धोनीचं नाव घेतलं तर वावगं ठरू नये. वन-डे क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक यष्टीचीत बळी घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे. ३४५ डावांमध्ये धोनीने आतापर्यंत १२३ यष्टीचीत आणि ३२१ झेल घेतले आहेत.
-
३) वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर जमा आहे. ३५० वन-डे सामन्यांत धोनी ८४ वेळा नाबाद राहिला आहे.
-
२) ५० पेक्षा जास्त सरासरीने वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीव्यतिरीक्त विराट कोहलीला हा कारनामा जमला आहे.
-
१) वन-डे क्रिकेटमध्ये भारताला सर्वाधिक सामने जिंकून देणारा कर्णधार हा विक्रमही धोनीने आपल्यानावे जमा केला आहे. आतापर्यंत २०० वन-डे सामन्यांत धोनीने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. ज्यात ११० सामन्यांमध्ये धोनीने भारताला विजय मिळवून दिला आहे. धोनीच्या खाली मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली हे माजी कर्णधार असून त्यांनी आतापर्यंत अनुक्रमे ९० आणि ७६ वन-डे सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे.

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा